महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Shah Rukh Khan Jawan Movie : 'जवान' चित्रपटाद्वारे शाहरुख खाननं जिंकली चाहत्यांची मनं... - Shahrukh Khan and Movie Jawan

Shah Rukh Khan Jawan Movie : 'जवान' हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालाय. सकाळी 5 वाजता चाहत्यांनी चित्रपटगृहांमध्ये शोसाठी गर्दी केली होती. चित्रपट प्रदर्शित झाल्याने 'किंग खान'चे चाहते सध्या खूप आनंदी आहेत.

Shahrukh Khan and Movie Jawan
शाहरुख खान आणि जवान चित्रपट

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 7, 2023, 9:59 AM IST

Updated : Sep 7, 2023, 11:53 AM IST

मुंबई - Shahrukh Khan and Movie Jawan : शाहरुख खानच्या 'पठाण'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता शाहरुख खान 'जवान'द्वारे धमाका करण्यासाठी सज्ज आहे. हा चित्रपट आज पहाटे 5 वाजता रूपेरी पडद्यावर रिलीज झाला. 'जवान'ने पहिल्याच शोमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या चित्रपटाबद्दल प्रेक्षक खूप उत्सुक होते. 'जवान' चित्रपटाची ही उत्सुकता आता चित्रपटगृहांमध्ये दिसून येत आहे. या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल आहेत. 'जवान'चा जेव्हा ट्रेलर रिलीज झाला होता, तेव्हा चाहत्यांची उत्सुकता कमालीची ताणली गेली होती.

'जवान'ने पहिल्या दिवशी केला धमाका :या चित्रपटाचं अ‍ॅडव्हान्स बुकिंग मोठ्या प्रमाणात झालं होतं. हा चित्रपट रूपेरी पडद्यावर जबरदस्त ओपनिंग करणार आहे. शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचे शो थिएटरमध्ये सुरू आहेत. हा चित्रपट पाहिल्यानंतर आता प्रेक्षकांच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. यासोबतच चित्रपटगृहाच्या आतून असे व्हिडिओही समोर आले आहेत, ज्यात चाहते शाहरुखला पडद्यावर पाहून नाचत आहेत. सोशल मीडियावर दिसणाऱ्या कमेंट्समध्ये बहुतांश लोकांनी शाहरुख खानच्या एन्ट्रीला 'ढासू' म्हटलं आहे. पहिल्याच दिवशी 'जवान' जगभरात 100 कोटी ओपन करू शकतो, अशी अपेक्षा केली जात आहे.

शाहरुख खान आणि नयनताराच्या जोडीला पसंती :देशांतर्गत कमाई सुमारे 70-75 कोटी रुपये असू शकते. या चित्रपटात शाहरुख खानसोबत विजय सेतुपती आणि नयनतारा यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटामध्ये दीपिका पदुकोणचा कॅमिओ आहे. शाहरुख खानची एंट्री, पार्श्वसंगीत आणि शाहरुखचे वेगवेगळे रूप चाहत्यांना आवडलं आहे. चित्रपटगृहांच्या आत आणि बाहेर उत्सवाचं वातावरण आहे. सध्या अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेच, ज्यात चाहते चित्रपटगृहांबाहेर नाचताना दिसत आहेत. यापूर्वी, मुंबई, बिहारमधील मोतिहारी आणि पश्चिम बंगालमधील कोलकाता यासारख्या असंख्य शहरांनी या चित्रपटाचा क्रेझ पाहून या चित्रपटाची स्क्रीनिंग 5 वाजता आयोजित केलं. पश्चिम बंगालमधील रायगंज या शहराने आधीच इतर सर्व शहरांना मागे टाकले आहेत आणि पहाटे 2.15 वाजता शो शेड्यूल केला आहे. शाहरुख खान आणि नयनताराच्या जोडीला चाहते भरभरून पसंती देत आहेत.

Last Updated : Sep 7, 2023, 11:53 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details