मुंबई- हॉलिवूडमधील सर्वात महागडे बजेट असलेला हृदयस्पर्शी मेगा ब्लॉकबस्टर चित्रपट 'अवतार'च्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा संपली आहे. १६ डिसेंबर रोजी हा भव्या नेत्रदिपक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने प्रचंड उत्सुकता निर्माण केली असून हा चित्रपट जगभरातील 52 हजार आणि भारतात 3 हजार स्क्रिन्सवर रिलीज केला जात आहे.
या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला भारतात प्रचंड प्रतिसाद मिळाला असून पहिल्या विकेंडपर्यंत 5,49,774 तिकीटांची विक्री झाली आहे. यावेळी पुन्हा चित्रपट थ्रीडीमध्येही दिसणार आहे. डायनॅमिक रेंज, उच्च फ्रेम रेट, उत्तम रिझोल्यूशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्स चित्रपटाची मजा द्विगुणित करणार आहेत. त्यामुळे चित्रपटाच्या तिकीटांची किमातही जास्त असणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन जेम्स कॅमेरून यांनी केले आहे. यावेळी चित्रपटात मागील कलाकारांसोबत केट विन्सलेट, मिशेल येहो, डेव्हिड थेवलीस आणि विन डिझेल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. इंग्रजीशिवाय हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतही प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस (16 डिसेंबर) प्रदर्शित होणार आहे.
'अवतार 2' ची पटकथा तयार करण्यासाठी लागली 13 वर्षे - दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांनी खुलासा केला की 'अवतार 2' ची पटकथा तयार करण्यासाठी किमान 13 वर्षे लागली. व्हरायटीनुसार, कॅमेरॉनने शेअर केले की "अवतार: द वे ऑफ वॉटर" च्या आधी संपूर्ण 'अवतार 2' ची पटकथा लिहिली गेली होती आणि नंतर कचऱ्यात फेकली गेली. असे दिसून आले की 2009 च्या "अवतार" आणि 2022 च्या "द वे ऑफ वॉटर" मधील 13 वर्षांच्या अंतराचे किमान एक संपूर्ण वर्ष एका पटकथेवर वाया घालवले गेले होते जे कधीही प्रकाशात येणार नाही.
अवतार १ का यशस्वी झाला यावर दीर्घ चर्चा - दिग्दर्शक कॅमेरॉन म्हणाले, "जेव्हा मी माझ्या लेखकांसोबत 'अवतार 2' सुरू करण्यासाठी बसलो, तेव्हा मी म्हणालो की पहिल्या भागात इतके काय चांगले होते, हे समजत नाही तोपर्यंत आम्ही पुढचे काम करू शकत नाही. काय घडले याचे कोडं आपण सोडवले पाहिजे." असा प्रकारे पटकथेवर कठोर मेहनत करत टीमने ही पटकथा बनवली व शूटिंगला सुरुवात केली होती.
कॅमेरून आणि त्यांची टीम यावर उपाय घेऊन आली. त्याने शेअर केले की, "सर्व चित्रपट वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करतात. पहिला पृष्ठभाग असतो, जो कॅरेक्टर, समस्या आणि रिझोल्यूशन असतो. दुसरा विषयगत असतो. चित्रपट काय सांगू पाहत आहे? पण 'अवतार' तिसऱ्या स्तरावरही काम करतो, सुप्त मन. मी सिक्वेलसाठी संपूर्ण स्क्रिप्ट लिहिली, ती वाचली आणि लक्षात आले की ते लेव्हल थ्रीपर्यंत पोहोचलेले नाही. बूम. पुन्हा काम सुरू करा. त्याला एक वर्ष लागले."