महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

School, College and Life : स्कुल, कॉलेज आणि लाईफ चित्रपटाच्या ट्रेलरमुळे प्रेक्षक जुन्या आठवणीत रमले - विहान सुर्यवंशी

विहान सुर्यवंशी दिग्दर्शित स्कुल, कॉलेज आणि लाईफ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे सादरी करण रोहित शेट्टी करणार असून या चित्रपटाद्वारे तो मराठी सिनेमाच्या निर्मितीत उतरला आहे.

स्कुल, कॉलेज आणि लाईफ
स्कुल, कॉलेज आणि लाईफ

By

Published : Mar 21, 2023, 3:07 PM IST

मुंबई- रोहित शेट्टी मराठी चित्रपट निर्मितीत उतरला असून त्याने आपल्या पहिल्या मराठी सिनेमाचा ट्रेलर काल रिलीज केला होता. विहान सुर्यवंशी दिग्दर्शित स्कुल, कॉलेज आणि लाईफ असे या चित्रपटाचे शीर्षक आहे. बिग बॉस फेम तेजस्वी प्रकाश, करण परब आणि जितेंद्र जोशी यांच्या यात मुख्य भूमिका आहेत.

या चित्रपटात शाळा, त्यातील मित्र, शाळेच्या वर्गातील आणि बालपणीच्या आठवणी, तारुण्य, मैत्री आणि आयुष्यभराची प्रेमकथा यांची सुंदर गुंफण टित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे. शाळा, कॉलेज आणि लाइफ चित्रपट एका माणसाच्या प्रेमप्रकरणाची एक हृदयस्पर्शी, नॉस्टॅल्जिक होऊन पाहतानाची आणि त्याच्या गुरूसोबतच्या अतिशय खास मैत्रीची कथा आहे जी त्याला त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करते. ही गोष्ट हलकी, रोमँटिक आणि भावनाप्रधान, कल्पनारम्य वास्तववादाने रंगलेली आहे.

टीव्हीवरची लोकप्रिय अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही हिंदीमध्ये सक्रिय होती. गेल्या वर्षी मन कस्तुरी रे या चित्रपटातून ती पहिल्यांदा मराठी रुपेरी पडद्यावर झळकली होती. त्यानंतर ती आता स्कुल, कॉलेज आणि लाईफ या चित्रपटातून ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. मन कस्तुरीमध्ये तिच्यासोबत लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा अभिनय बेर्डे काम करत होता. आता ती मराठी चित्रपटासाठी सरावलेली असून या चित्रपटाकडून तिला मोठ्या अपेक्षा आहेत. रोहित शेट्टीसारखा हिंदीतील प्रथित यश दिग्दर्शक या सिनेमाचा प्रेझेन्टर असल्यामुळे याचा लाभ सिनेमाला होणार हे निश्चित आहे.

मराठी सिनेमासमृद्ध आशय आणि विषयासाठी ओळखला जातो. या चित्रपटाची कथा प्रत्येक प्रेक्षकाला आपल्या गत काळाच्या आठवणीत रमवणारा आहे. शाळेतील अनेक प्रसंग हे आपल्याला नॉस्टेल्जिक करणारे ठरु शकतात. शाळातील मित्र, त्यांच्यासोबतच्या जेवणाच्या डब्यापासून शेअर केलेल्या अनेक आठवणी या निमित्ताने पुन्हा जागवल्या जाणार आहेत. शाळा, कॉलेज आणि लाइफ या चित्रपटाची निर्मिती रोहित शेट्टी, पवित्रा गांधी, विवेक शाह यांनी रिलायन्स एन्टरटन्मेंटसाठी केली असून रोहित शेट्टी याचे प्रेझेन्टर असणार आहेत.

हेही वाचा -Rani Mukerji Birthday : हॅप्पी बर्थडे राणी मुखर्जी, पहा अभिनेत्रीची अप्रतिम फिल्मोग्राफी...

ABOUT THE AUTHOR

...view details