महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अभिनय बेर्डे आणि तेजस्वीच्या रोमँटिक 'मन कस्तुरी रे' ट्रेलरने जिंकली प्रेक्षकांची मने - Tejashwi Prakash Marathi Debut

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश अभिनय बेर्डे ( Abhinay Berde ) यांच्या 'मन कस्तुरी रे' ( Man Kasturi Re ) या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. ट्रेलरमधून मुंबईच्या पार्श्वभूमीवरील एक रोमँटिक प्रेमकथा पाहायला मिळणार असल्याचे संकेत दिसत आहेत.

'मन कस्तुरी रे'च्या ट्रेलरने जिंकले प्रेक्षकांची मने
'मन कस्तुरी रे'च्या ट्रेलरने जिंकले प्रेक्षकांची मने

By

Published : Oct 17, 2022, 8:05 PM IST

Updated : Oct 18, 2022, 4:05 PM IST

मुंबई- बिग बॉस 15 ची विजेती अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ( Tejasswi Prakash ) आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे ( Abhinay Berde ) यांच्या 'मन कस्तुरी रे' ( Man Kasturi Re ) या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. तेजस्वीचा हा पहिलाच चित्पट असून मराठी चित्रपटातून ती आपले पदार्पण साजरे करणार आहे.

ट्रेलरमधून मुंबईच्या पार्श्वभूमीवरील एक रोमँटिक प्रेमकथा पाहायला मिळणार असल्याचे संकेत दिसत आहेत. अभिनय आणि तेजस्वीची जोडी छान दिसत असून दोघांची ऑनस्क्रिन केमेस्ट्रीही मस्त आहे. 'मन कस्तुरी रे'चा ट्रेलर चित्रपटाबद्दलची उत्कंठा निश्चितपणे वाढवणारा आहे.

'मन कस्तुरी रे' चे दिग्दर्शन संकेत माने ( Sanket Mane ) यांनी केले असून यापूर्वी त्यांनी खारी बिस्किट (2019) आणि परी हूं मैं (2018) सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. हा चित्रपट एक प्रेमकथा आहे ज्यात तेजस्वीने श्रुती नावाच्या तरुणीची भूमिका केली आहे. मुंबईवर आधारित हा चित्रपट नवीन काळातील रोमँटिक ड्रामा आहे. हा चित्रपट ४ नोव्हेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

'मन कस्तुरी रे' नंतर, तेजस्वी प्रकाशचा आणखी एक मराठी चित्रपट पाइपलाइनमध्ये आहे. रोहित शेट्टीची निर्मिती असलेला विहान सूर्यवंशी दिग्दर्शित दिग्दर्शित 'स्कूल कॉलेज आणि लाइफ'मध्ये अभिनेत्री तेजस्वी दिसणार आहे. या चित्रपटात तेजस्वी करण किशोर परबसोबत दिसणार आहे. दरम्यान छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्वी तिच्या बहुचर्चित टेलिव्हिजन शो नागिन 6 मध्ये भूमिका साकारत आहे.

हेही वाचा -जगातील 10 सुंदर महिलांच्या यादीत दीपिका पदुकोणचा समावेश

Last Updated : Oct 18, 2022, 4:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details