मुंबई- निर्माता दिनेश विजान यांचा लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित जरा हटके जरा बचके या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. विकी कौशल आणि सारा अली खानची प्रमुख भूमिका असलेला रोमँटिक कॉमेडी चित्रपटाचा धमाल ट्रेलर प्रेक्षकांना मनोरंजनाची हमी देताना दिसत आहे.
ट्रेलरची सुरूवात विकी कौशल आणि सारा अली खान साकारत असलेल्या कपिल आणि सौम्या या इंदोरमध्ये राहणाऱ्या मध्यमवर्गीय जोडप्याच्या लग्नापासून होते. लग्नाची नवी नवलाई, फुलत जाणारे प्रेम आणि वाढत जाणारा रोमान्स सुरुवातीला दिसतो. ह्रषिकेश मुखर्जीच्या चित्रपटात दिसणारे मोठे कुटुंबीय आणि त्यांच्या आपुलकीचे प्रेम याचे दर्शन ट्रेलरमध्ये घडते. काळाबरोबरच यांच्या वैवाहिक जीवनातले सूर बेसूर होत जातात, मग सुरू होते नवरा बायकोतील टिपीकल तू तू मैं मैं. एकमेकांवरील आरोपांची जागा चक्क भांडणापर्यंत पोहोचले. आता हा खटला न्यायालयापर्यंत पोहोचतो. न्यायालयातील लढाई घटस्फोटाप्यंत जाऊन पोहोचते. घटस्फोटाच्या भाषेने दोघांचेही कुटुंब हादरते. इतकेच नाही पण आपण घटस्फोटापर्यंत पोहोचलोय याचीही दोघांना आश्चर्य वाटते. एकंदरीत धमाल रोमंटिक कॉमेडीची धमाल स्टोरी या चित्रपटातून मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.