महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

movie Battalion 60 : एका शूर सैनिकाची गाथा अनुभवायला मिळणार 'बटालियन ६०' मधून! - एका शूर सैनिकाची गाथा

देशभक्तीवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात, असा निर्मात्यांचा अनुभव आहे. याच पठडीतील 'बटालियन ६०' हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे.

movie Battalion 60
'बटालियन ६०'

By

Published : Jun 24, 2023, 5:26 PM IST

मुंबई - आपल्या देशाची रक्षा करणारे सैनिक हे खरे तर रियल हिरो आहेत परंतु बहुतांश सामान्य जनता रील हिरोज ना डोक्यावर घेते. शक्यतो वीर सैनिकांच्या गाथा आपल्या पर्यंत पोहोचत नाही. त्यामुळेच अशा कथा सिनेमासाठी उत्तम कथानकं बनतात आणि ते चांगल्या पद्धतीने पेश केले की प्रेक्षकही आनंदाने पाठिंबा देतात. सीमेवरील जवानांच्या कथा बघताना प्रेक्षकांची देशप्रेमाची भावना जागृत होते. अशाच पद्धतीची एका शूर सैनिकांची गाथा आगामी चित्रपट 'बटालियन ६०' मधून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. अभिनेता गणेश शिंदे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असून त्याची भूमिका असलेला बलोचला देखील प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता.

'बटालियन ६०' पोस्टर

देशप्रेमींसाठी पर्वणी ठरणारे चित्रपट नेहमीच प्रेक्षकांना आवडत असतात. 'बटालियन ६०' हा त्यातीलच एक चित्रपट. देशाच्या सैनिक भरतीत महाराष्ट्राचा नंबर खूप वरती लागतो. अनेक वीरपुत्रांनी महाराष्ट्राचे आणि देशाचे नाव उज्ज्वल केले, तसेच काहीजणांना हौतात्म्य मिळालं. महाराष्ट्रातील काही गावं सैनिकभरतीसाठी प्रसिद्ध असून त्या गावांत प्रत्येक घरातून एकतरी माणूस सैन्यात तैनात असतो. या जवानांना ट्रेनिंग कसे व कुठे मिळते, तसेच त्यांचा खडतर प्रवास कसा असतो हे अधोरेखित करणारा हा चित्रपट आहे.


'शपथ घेतो मायभूमीला वंदूनी,
तुझ्या रक्षणा सदैव सज्ज या जीवनी...
दुश्मनाच्या छाताडावर नाचतो युद्धविर,
भारतमाते तुझाच अग्निविर!'
'बटालियन ६०' मधील प्रमुख पात्र हे गाताना दिसणार आहेत.

निर्माते तुषार कापरे पाटील यांच्या 'किंग प्रोडक्शन' या बॅनर खाली याची निर्मिती झाली असून दिग्दर्शनाची धुरा वाहिली आहे प्रीतम एस के पाटील यांनी. महाराष्ट्राच्या मातीतील एका शूरवीराची ही कथा असून या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. एक पाठमोरा सैनिक, बॉर्डर वरील रायफलधारी जवान या पोस्टरवर दिसत असून यातून चित्रपटाचा आशय कळून चुकतो.

ABOUT THE AUTHOR

...view details