मुंबई - डॉ अमोल कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका लीलया साकारतात. त्यांना शिवकाळाचा गाढ अभ्यास आहे. आता ते शिवप्रताप - गरुडझेप या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. महत्वाचे म्हणजे त्यांच्या या चित्रपटाचे शूटिंग चक्क दिल्लीच्या लाल किल्ल्यात झाले. हे मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद असले तरी तेथे चित्रीकरण करताना त्याच्या टीमला बरेच श्रम करावे लागले. त्याबद्दल डॉ अमोल कोल्हे यांनी समाज माध्यमावर सविस्तरपणे लिहिले.
ते लिहितात, “अशा वातावरणात शूटींग करणे म्हणजे वेडेपणा आहे, आग्र्याच्या लाल किल्ल्यात शूटींग? कसं शक्य आहे? अनेकांच्या अनेक शंका.... पण प्रत्यक्ष इतिहास जणू 356 वर्षांनंतर त्या घटनेला कॅमेऱ्याच्या लेन्स मधून पाहणार होता.. ASI नियमावलीचे पालन करता करता होणारी दमछाक, त्यात 38-40 डिग्री असलं तरी 70% आर्द्रतेमुळे 42-44 वाटणारं तापमान ते ही सकाळी 9 वाजता, चुकून टाचणी विसरली तरी किल्ल्यातून base camp पर्यंत पायपीट, ना बसायला खुर्ची ना पंखा.. सावलीसाठी आडोशाला उभं राहावं तर घामाच्या धारा आणि जरा हवेशीर ठिकाणी उभं राहावं तर उन्हाच्या झळा..रोज 4-5 जण अंथरूण धरायचे नाहीतर थेट हॉस्पिटल मध्ये.. तरी पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी ' बचेंगे तो और भी लडेंगे' या ईर्षेने शूटिंग सुरु...