महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Maherchi sadi 2 : 30 वर्षांनी येणार 'माहेरची साडी' चा दुसरा भाग... - माहेरची साडी पार्ट 2

३० वर्षांपूर्वी आलेल्या 'माहेरची साडी' या चित्रपटाचा एक मोठा चाहतावर्ग आहे. आता या चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्याचे स्वत: अलका कुबल यांनी सांगितले आहे.

Maherchi sadi 2
माहेरची साडी 2

By

Published : Mar 23, 2023, 4:01 PM IST

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या चित्रपटांपैकी माहेरची साडी या चित्रपटाचे नाव घेतले जाते. शहरी, ग्रामीण भागातील स्त्रीयांमध्ये या चित्रपटाची मोठी क्रेझ होती. प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तीस वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा आता दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे असे सांगण्यात आले आहे.


झी मराठी अवॉर्ड : झी मराठीच्या अवॉर्डच्या सोहळ्यात अलका कुबल यांनी या चित्रपटाची अधिक माहिती दिली आहे. यावेळी त्या माहेरची साडी २ मध्ये सासूच्या भूमिकेत सुनेचा छळ करताना दिसणार का, असा मिश्किल प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. तेव्हा अलका कुबल यांनी सांगितले की, मला देखील या चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्याचे कळाले आहे. अजुन मला त्याविषयी अधिक माहिती नाही, असे अलका कुबल यांनी सांगितले होते.


अलका कुबल यांची सुनेची भूमिका : माहेरची साडीच्या पहिल्या भागात अलका कुबल यांनी सुनेची भूमिका केली होती. त्यांच्या या सुनेच्या भूमिकेला मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळाला होता. मराठी प्रेक्षकांनी अलका कुबल यांचे कौतुक केले होते. त्या चित्रपटाने अलका कुबल घराघरात ओळख मिळाली होती. या चित्रपटातील गाणी देखिल लोकप्रिय झाली होती. हा चित्रपटाचे विजय कोंडके यांनी दिग्दर्शन केले होते, या चित्रपटामध्ये प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले, रमेश भाटकर, विजय चव्हाण, जयश्री गडकर, भालचंद्र कुलकर्णी, जयराम कुलकर्णी, उषा नाडकर्णी, अजिंक्य देव यांनी काम केले होते.


गाणी आजही प्रेक्षकांच्या तोंडपाठ :30 वर्षांपूर्वीच्या सिनेनातील भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. मराठीतील दिग्गज कलाकार या सिनेमात असल्याने त्यांनी या प्रत्येक भूमिकांना चांगला वाव दिला होता आणि भूमिका गाजवल्या होत्या. त्यानंतर ह्या कलाकारांना 'माहेरची साडी' सिनेमातील भूमिकेमुळे ओळखले जात होते. या सिनेमातील गाणी आजही प्रेक्षकांच्या तोंडपाठ आहेत. एकंदरितच एक मोठा चाहतावर्ग सिनेमाने कमावला होता.

हेही वाचा :Kangana Ranaut Birthday : कंगना रणौतने वाढदिवसानिमित्त दिला मनापासून संदेश, आई वडिलांचे मानले आभार

ABOUT THE AUTHOR

...view details