मुंबई - बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आणि आदित्य कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेली वेब सीरीज 'द नाईट मॅनेजर'ने इंटरनेटवर बरीच चर्चा घडवून आणली आहे. ही एक क्राइम थ्रिलर मालिका आहे, ज्याची निर्मिती संदीप मोदी यांनी केली आहे. फेब्रुवारीमध्ये निर्मात्यांनी मालिकेचे 4 भाग रिलीज केले होते, आता याचे भाग 2 रिलीज करताना, आणखी तीन भाग जोडले आहेत. द नाईट मॅनेजर ही वेब सिरीज याच नावाच्या ब्रिटीश मालिकेचा रिमेक आहे.
मूळ ब्रिटीश आवृत्तीचे सहा भाग होते आणि हा शो संपूर्ण मालिका म्हणून प्रसिद्ध झाला आहे. पण निर्मात्यांनी भारतीय मालिका दोन भागांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आणि दोन भागांमध्ये चार महिन्यांचे अंतर ठेवण्यात आले. म्हणूनच पहिला भाग फेब्रुवारीमध्ये आणि दुसरा भाग जूनमध्ये प्रदर्शित झाला. 'द नाईट मॅनेजर 2' 17 फेब्रुवारीला डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला होता, ज्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
अलीकडेच शोच्या निर्मात्यांनी द नाईट मॅनेजरचा भाग 2 रिलीझ केला आहे, यामध्ये सीझन 1 मध्ये 3 भाग जोडून शोची कथा पुढे नेण्यात आली आहे. अनिल कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांच्या द नाईट मॅनेजर 2 ला प्रेक्षकांचा खूप सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या शोमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता अनिल कपूरने त्याच्या इंस्टाग्रामवर भाग २ ची घोषणा करणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यावर चाहत्यांनी कमेंट करून आपले प्रेम दाखवले आहे. एका यूजरने लिहिले, 'झकास...'. तर एकाने लिहिले, 'अखेर प्रतीक्षा संपली'. निर्मात्यांनी नियोजित तारखेच्या एक दिवस आधी म्हणजेच 29 जून रोजी शो रिलीज केला.
या नवीन वेब सिरीजवर चाहते प्रेम करताहेत हे पाहून अनिल कपूर खूश झाला आहे. पहिल्या बागात त्याने साकारलेली भूमिका ही केवळ एक क्रूरतेची एक झलक होती. दुसऱ्या बागात त्याची आक्रमक शैली आणि चतुरता याचे दर्शन प्रेक्षकांना घडते.