मुंबई- अजय देवगणचे चाहते बऱ्याच दिवसापासून दृष्यम २ च्या ट्रेलरची प्रतीक्षा करत होते. अकेर या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. विजय साळगावकर आणि त्याचे कुटुंब जुन्या एका दबलेल्या संकटाचा पुन्हा मुकाबला करताना या सिनेमात दिसणार आहे. अजय देवगण, श्रिया सरण, तब्बू आणि अक्षय खन्ना यांची भूमिका असलेला हा चित्रपट अभिषेक पाठक यांनी दिग्दर्शित केला आहे. १८ नोव्हेंबर रोजी चित्रपट देशभर थिएटर्समध्ये रिलीज होणार आहे.
दृष्यम २ च्या ट्रेलरमध्ये आपल्याला दिसते की खूनाची केस पुन्हा ओपन होते आणि साळगावकर कुटुंब धास्तावते. या संकटाचा सामना कसा करायचा हे विजयने ठरवले असले तरी त्याच्या दोन मुली आणि पत्नी भीतीच्या छायेत वावरताना दिसतात. नवा चतुर पोलीस अधिकारी खूनाच्या तळापर्यंत जाण्यासाठी नवी योजना आखतो आणि त्यासाठी नवा सापळा रचतो. या सापळ्यात साळगावकर कुटुंब बरोबर सापडते आणि विजय कन्फेशन देतो. पण तो मृतदेह सापडतो का, यात साळगावकर कुटुंब दोषी ठरते का आणि सिनेमाचा अखेर काय होतो याच्याबद्दलची उत्सुकता या ट्रेलरमुळे वाढली आहे.