मुंबई: चित्रपट निर्माता विपुल शाह, अभिनेत्री अदा शर्मा आणि 'द केरळ स्टोरी' टीमने गुरुवारी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची मुंबईत भेट घेतली. नितीन गडकरी यांनी त्याच्या ट्विटर हँडलवर आणि इंन्टाग्रामवर चित्रपट निर्माते विपुल शाह, आशिन शाह आणि कलाकार अदा शर्मा, योगिता बिहानी आणि सोनिया बालानी यांच्यासोबतचे फोटो टाकले आहे. एका फोटोत केरळ स्टोरी टीम नितीन गडकरींसोबत चर्चा करताना दिसत आहे. त्यांनी ग्रुप फोटोसाठी पोजही दिली. 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाला अनेकदा टीकेला सामोरे जावे लागत आहे. काही राज्यात तर या चित्रपटावर बंदी आणली होती आणि काही राज्यात या चित्रपटाला करमुक्त केले होते. अदा शर्माचा चित्रपट इतक्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्यावरही या चित्रपटाने 200 कोटीची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर पठाणनंतर या चित्रपटाने विजयाचा ध्वज रोवला आहे.
'द केरळ स्टोरी' स्टार कास्ट भेटली नितीन गडकरी यांना : 'द केरळ स्टोरी' या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी मुख्य भूमिकेत आहेत. केरळमधील 32,000 महिला बेपत्ता झाल्या आणि दहशतवादी गट ISIS मध्ये सामील झाल्याचा दावा चित्रपटाच्या ट्रेलरने केला होता, तेव्हा या चित्रपटाभोवती वाद सुरू झाला. त्यानंतर या अनेक राजकिय पक्षांनी या प्रकरणात उडी मारली आणि त्यानंतर राजकीय वादविवाद सुरू झाला. याशिवाय अनेक नेत्यांनी दाव्याच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.