महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Box office 9th day collection : बॉक्स ऑफिसवर द केरळ स्टोरीची दमदार कामगिरी, अवघ्या नवव्या दिवशी 100 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी - चित्रपटाचे प्रदर्शनावर बंद

'द केरळ स्टोरी' रिलीजच्या 9व्या दिवशी 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. अदा शर्मा स्टारर या चित्रपटाने ९व्या दिवशी जबदस्त कमाई केली आहे.

द केरळ स्टोरी
The Kerala Story

By

Published : May 15, 2023, 11:45 AM IST

मुंबई: 'द केरळ स्टोरी' रिलीज हा वादात होता. मात्र शेवटी हा चित्रपट प्रदर्शित झाला. सुदीप्तो सेन दिग्दर्शक 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई केली आहे. या चित्रपटाला पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने चित्रपटगृहात पोहोचत आहेत. त्यामुळे हा चित्रपट जबरस्त कमाई करत आहे. रिलीजच्या 9व्या दिवशी, चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 112.99 कोटी रुपयांची कमाई केली आहे. याबद्दल माहीती ही चित्रपटाच्या निर्मात्यांनी रविवारी दिली. 'सनशाइन पिक्चर्स'ने एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, या चित्रपटाने शनिवारी 19.5 कोटी रुपयांची कमाई केली असून, देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर एकूण कलेक्शन 112.99 कोटी रुपये झाले आहे.

100 कोटींच्या क्लबमध्ये 'द केरळ स्टोरी' : सुदीप्तो सेन दिग्दर्शित हा चित्रपट १२ मे रोजी ३७ देशांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेत्री अदा शर्माने उत्कृष्ट अभिनय केला आहे. तसेच या चित्रपटातमध्ये केरळमधील महिलांचे बळजबरीने धर्मांतर करून त्यांना इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेत कसे भरती करण्यात आले हे दाखवण्यात आले आहे. इंडस्ट्रीटॅक्टर्सनुसार चित्रपटगृहांमध्ये 8.03 कोटी रु. सह खाते उघडल्यानंतर पहिल्या वीकेंडमध्ये चित्रपटाने त्याच्या कलेक्शनमध्ये वाढ दर्शविली. 6 मे रोजी 11.22 कोटी रुपये आणि 7 मे रोजी 16.40 कोटी रुपये कमावले. 8 मे रोजी एकूण 10.07 कोटी रुपये जमा झाले, त्यानंतर 9 मे रोजी 11.14 कोटी रुपये, 10 मे रोजी 12 कोटी रुपये आणि 11 मे रोजी 12.50 कोटी रुपयाचे कलेक्शन झाले.

चित्रपटाला अनेक वाद आणि विरोधालाही जावे लागले होते सामोरे :पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारने राज्यात चित्रपटावर बंदी घातली आहे, तर तामिळनाडूमधील मल्टिप्लेक्सने कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव चित्रपटाचे प्रदर्शनावर बंद घातली होती. त्याच वेळी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशसारख्या भाजपची सत्ता असलेल्या राज्यांनी या चित्रपटाला करमुक्त घोषित केले. विशेष म्हणजे या चित्रपटाला अनेक वाद आणि विरोधालाही सामोरे जावे लागले होते. आता हा चित्रपट आणखी किती जास्त कमाई करणार हे येणाऱ्या काळात समजेल.

हेही वाचा :Parineeti Raghav Engagement : परिणीती-राघव यांचा साखरपुडा संपन्न; पाहा फोटो अन् व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details