मुंबई :अदा शर्माचा 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट रूपेरी पडद्यावर खूप गाजला. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले. हा चित्रपट प्रेक्षकांना 'द काश्मीर फाइल्स'प्रमाणे प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. 'द केरळ स्टोरी'च्या यशानंतर अदा शर्माला खूप चांगली प्रसिद्ध मिळाली आहे. अनेकदा ती सोशल मीडियावर स्वतःबद्दल अपडेट देताना दिसते. दरम्यान आता नुकतीच अदाबद्दल एक बातमी समोर आली होती. अदा शर्मा सुशांत सिंग राजपूतचा फ्लॅट विकत घेणार असल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. नुकतीच अदा ही सुशांत सिंग राजपूतच्या फ्लॅटबाहेर दिसली, त्यानंतर अदा हा फ्लॅट विकत घेईल असे सर्वांना वाटू लागले होते.
अदा शर्माने दिली प्रतिक्रिया :सुशांत सिंग राजपूतच्या फ्लॅट खरेदी संदर्भात अदा शर्माने आपली प्रतिक्रिया दिली आहे. अदाने यावर बोलताना सांगितले, 'जे काही असेल ते मी तुम्हाला आधी सांगेन. मी तुम्हाला वचन देते की ते काहीही असो... मी तुमचे तोंड गोड करीन... काहीही असेल तरी'. असे तिने तिच्या चाहत्यांना म्हटले आहे. खूप दिवसांपूर्वी सुशांतने एका पेंटच्या जाहिरातीची झलक शेअर केली होती. या जाहिरातीत सुशांतने त्याच्या आवडीची अनोखी सजावट आणि फोटो देखील प्रदर्शन केले होते. याशिवाय सुशांतने त्याच्या टेलीस्कोपबद्दल देखील 'द कपिल शर्मा' शोमध्ये सांगितले होते. सुशांतने त्याचे घर त्याच्या आवडीप्रमाणे सजवले होते.