महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

The Kerala Story Box Office: 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाने 200 कोटींचा आकडा पार केला - अदा शर्मा

'द केरळ स्टोरी' चित्रपटाने 18 व्या दिवशीच 200 कोटींचा आकडा गाठला आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून अनेक वाद आणि निषेधाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पण या सगळ्याचा चित्रपटाच्या कलेक्शनवर काहीही परिणाम झाला नाही.

The Kerala Story Box Office
The Kerala Story Box Office

By

Published : May 23, 2023, 12:31 PM IST

मुंबई : 'द केरळ स्टोरी' रिलीज होऊन तीन आठवडेही पूर्ण झाले नाहीत. आणि चित्रपटाने 18 व्या दिवशीच 200 कोटींचा आकडा पार केला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापुर्वी आणि झाल्यानंतर निषेधाच्या भोवऱ्यात सापडला होता. मात्र या सगळ्याचा चित्रपटाच्या कलेक्शनवर काहीही परिणाम झाला नाही आहे. अदा शर्मा-स्टार 'द केरळ स्टोरी'च्या बॉक्स ऑफिसवर रिलीजच्या १८व्या दिवशी कलेक्शनमध्ये मोठी घट झाली आहे. तसेच या चित्रपटाने 22 मे रोजी केवळ 5.50 कोटींची कमाई केली, जी उर्वरित दिवसांच्या तुलनेत फारच कमी आहे. मात्र असे असतानाही या चित्रपटाने 200 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे.

हा चित्रपट वादांमुळे चर्चेत आला होता :केरळ स्टोरी रिलीज झाल्यापासूनच चर्चेत होता. अनेक वादांनंतर हा चित्रपट ५ मे रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला विरोधालाही सामोरे जावे लागले होते. अनेक राज्यांमध्ये या चित्रपटावर बंदी घातली होती, पण तरीही या चित्रपटाने चांगली कामगिरी केली. या वादामुळे या चित्रपटाला थोडी प्रसिद्धी मिळाली आणि त्याने बॉक्स ऑफिसवर लक्षणीय आकडा पार केला. या चित्रपटात अदा शर्मा मुख्य भूमिकेत आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन हे सुदीप्तो सेनने यांनी केले आहे.

'द केरळ स्टोरी' धार्मिक धर्मांतराच्या गंभीर विषयावर आधारित : वास्तविक पाहता 'द केरळ स्टोरी' धार्मिक धर्मांतराच्या गंभीर विषयावर आधारित आहे. तसेच या चित्रपटाचे आणि कथा ही तीन महिलांभोवती फिरते, ज्या लव्ह जिहादच्या बळी ठरतात. आणि याच्या आड त्यांना एका विशिष्ट धर्माबद्दल ब्रेनवॉश करून दहशतवादी ISIS संघटनेत सामील होण्यास भाग पाडले जाते. सुरुवातीच्या कलेक्शनच्या अंदाजानुसार, चित्रपटाने 18 व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 5.50 कोटी रुपये कमावले. हे कलेक्शन गेल्या दिवशीच्या कलेक्शनपेक्षा 6 कोटींने कमी आहे. असे असूनही, 'द केरळ स्टोरी'चे एकूण कलेक्शन आता 204.47 कोटी रुपयांवर गेले आहे.

200 कोटींचा आकडा पार करणारे चित्रपट :या वर्षी प्रदर्शित झालेल्या बॉलीवूड चित्रपटांपैकी फक्त शाहरुख खानचा पठाण चित्रपट 200 कोटींचा टप्पा पार करू शकला. यानंतर द केरळ स्टोरीने हा करिष्मा दाखवला आहे. सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान'नेही 100 कोटींचा गल्ला पार केला. अक्षय कुमारचा सेल्फी आणि कार्तिक आर्यनचा शहजादाही बॉक्स ऑफिसवर धमाकेदार ठरला.

हेही वाचा :Anupam Kher suffered serious injury : अनुपम खेर यांना गंभीर दुखापत, शाहरुख खान आणि हृतिक रोशनलाही केले टॅग

ABOUT THE AUTHOR

...view details