हैदराबाद - Interesting facts about Salar : प्रभासचे चाहते आणि चित्रपट रसिक काही तासानंतर चित्रपटगृहात दाखल होणाऱ्या 'सालार' चित्रपटाची आतुरतेनं प्रतीक्षा करत आहेत. 'सालार' हा चित्रपट जगभर मोठ्या अपेक्षांसह प्रदर्शित होणार आहे. या निमित्ताने जाणून घेऊया त्या प्रोजेक्टबद्दलच्या काही रंजक गोष्टी
'सालार'च्या कथानकाची जुळणी सुमारे 15 वर्षांपूर्वी करण्यात आली होती. प्रशांत नील तेव्हा दिग्दर्शक नव्हता. एवढी मोठी कथा दिग्दर्शक म्हणून पहिल्याच प्रयत्नात सांगण्यासाठी बजेटच्या मर्यादा होणार हे त्याला दिग्दर्शक म्हणून माहिती होतं. त्यामुळेच काही चित्रपटांच्या शूटिंगनंतर प्रेक्षकांना 'सालार'च्या दुनियेची ओळख करून द्यायची तयारी त्यानं ठेवली होती.
प्रशांत नील यानं दिग्दर्शक म्हणून 'उग्राम' हा पहिला चित्रपट केला. कन्नडमध्ये बनलेल्या या चित्रपटाचे नंतर इतर भाषातही रिलीज झाले. दिग्दर्शनातले आपलं कौशल्य त्यानं या पहिल्याच लक्षवेधी चित्रपटातून सिद्ध केलं. या चित्रपटाला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. त्यानंतर 'केजीएफ' चित्रट बनवून त्याचे दोन्ही भाग त्याने दिग्दर्शित केले. विशेष म्हणजे त्याच्या सर्वच चित्रपटाचं लेखनही प्रशांत नील स्वतःच करतो. 'केजीएफ'च्या यशानंतर त्यांनी 15 वर्षापूर्वी लिहिलेल्या 'सालार'च्या कथानकावर काम सुरू करण्याचे ठरवले. 'सालार' हा प्रशांत नील यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे.
'सालार' चित्रपटासाठी त्याने प्रभासची निवड केवळ पॅन इंडिया रिलीज समोर ठेवून केली नाही तर त्यांना देवा या 'सालार'च्या व्यक्तीरेखेसाठी प्रभासहून दुसरा उत्तम पर्यायी अभिनेता दुसरा कोणी वाटला नाही. नियोजित नसतानाही चित्रीकरणादरम्यान हा चित्रपट दोन भागात बनवण्याचे त्याने ठरवले.
सध्या सुरू असलेल्या सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या ट्रेंडच्या पार्श्वभूमीवर प्रमोशनल व्हिडिओ रिलीझ झाले तेव्हा 'केजीएफ' आणि 'सालार' यांच्यात संबंध असल्याचा अंदाज अनेकांनी बांधला होता. मात्र, या दोन्ही चित्रपटामध्ये कोणताही संबंध नसल्याचं दिग्दर्शकाने स्पष्ट केले. दुसरीकडे, तो म्हणाला की हा जाहिरातीप्रमाणे 'उग्राम'चा रिमेक नाही. 'केजीएफ'चा नायक यश या चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून झळकणार अशी अटकळही काही लोकांनी बांधली होती.