महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

The Great Indian Family: अतरंगी फॅमिलीची धमाल कथा, विकी कौशलने करुन दिली इरसाल कुटुंबियांची ओळख - Vicky Kaushal shares hilarious release date

'जरा हटके जरा बचके' चित्रपटाच्या यशानंतर विकी कौशल नव्या चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. त्याची आणि मानुषी छिल्लरची मुख्य भूमिका असलेला 'द ग्रेट इंडियन फॅमिली' हा चित्रपट येत्या २२ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. अतरंगी फॅमिलीची धमाल कथा असेला हा कॉमेडी चित्रपट विकीच्या चाहत्यासाठी मोठे आकर्षण आहे.

The Great Indian Family
अतरंगी फॅमिलीची धमाल कथा, द ग्रेट इंडियन फॅमिली

By

Published : Aug 14, 2023, 7:56 PM IST

मुंबई- यशराज फिल्म्सच्या नव्या चित्रपटाची घोषणा झाली असून विकी कौशल आणि मानुषी छिल्लर यांचा आगामी 'द ग्रेट इंडियन फॅमिली' हा चित्रपट पुढील महिन्यात रिलीज होणार आहे. निर्मात्यांनी सोमवारी 'द ग्रेट इंडियन फॅमिली'च्या रिलीजची तारीख जाहीर केली. २२ सप्टेंबर रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार आहे. शाहरुख खानचा अ‍ॅक्शनर 'जवान' हा चित्रपट त्यानंतर दोन आठवड्यांनी ७ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात रिलीज होईल.

विकी आणि मानुषी यांच्या प्रमुख भूमिका असलेला, 'द ग्रेट इंडियन फॅमिली' या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय शंकर आचार्य यांनी केले आहे. चित्रपटाच्या पोस्टर व शीर्षकावरुन हा चित्रपट कौटुंबिक कॉमेडी असणार असल्याचे खात्री पटते. भारताच्या घराघरात घडणारी मध्यवर्ती कथा यात मांडण्यात आली आहे.

सोशल मीडियावर विकी कौशलने एक पोस्ट शेअर करुन या पोस्टरसह रिलीज तारखेची घोषणा केली. यशराज फिल्म्सचा हा चित्रपट मजेदार कौटुंबिक मनोरंजन करणारा असल्याचे दिसते. यासाठी विकीने शेअर केलेला व्हिडिओ जरुर पाहा. भारतीय एकत्र कुटुंब जेव्हा वेगवेगळ्या वयाच्या सदस्यांसह एकत्र राहत असते तेव्हा त्याचे फायदे आणि तोटेही असतात. विकी यात आपल्या अतरंगी फॅमिली सदस्यांची ओळख करुन देताना दिसतो.

दरम्यान, विकी कौशल आगामी मेघना गुलजारच्या सॅम बहादूर चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान लष्करप्रमुख असलेल्या सॅम माणेकशॉ आणि फील्ड मार्शल बनलेला पहिला भारतीय लष्करी अधिकारी यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात सान्या मल्होत्रा आणि फातिमा सना शेख यांच्याही भूमिका आहेत.

मानुषी छिल्लरचा विचार करता तिने यशराज फिल्म्ससोबत तीन चित्रपटांचा करार केला होता. पैकी 'सम्राट पृथ्वीराज' हा तिचा ऐतिसाहिसक चित्रपट रिलीज झाला. यात ती संयोगिता ही व्यक्तिरेखा साकारत होती. आता ती विकी कौशलसोबत तिचा दुसरा चित्रपट करण्यासाठी सज्ज झाली आहे. यानंतर ती दिनेश विजानच्या आगामी चित्रपटाही झळकणार आहे. 'द ग्रेट इंडियन फॅमिली' हा चित्रपट तिच्या कारकिर्दीला योग्य कलाटणी देऊ शकतो.

हेही वाचा -

१.Box Office Surprise: चायनीज चित्रपट 'नो मोअर बेट्स'ने ब्लॉकबस्टर 'बार्बी'ला टाकले पिछाडीवर

२.Ananya Panday Invites Troll : मनजोत सिंगपासून फोटोसाठी दूर गेल्याने अनन्या पांडेने दिले ट्रोलर्सना आमंत्रण

३.Kangana Ranaut : कंगना रणौतने 'चंद्रमुखी २'मध्ये केले भरतनाट्यम ; पण नृत्यामुळे झाली ट्रोल

ABOUT THE AUTHOR

...view details