महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

The great indian family trailer out : 'द ग्रेट इंडियन फॅमिली' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज ; पाहा व्हिडिओ... - विक्की कौशल आणि मानुषी छिल्लर

The great indian family trailer out : 'द ग्रेट इंडियन फॅमिली' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर पाहून चाहत्यांची या चित्रपटाबाबत उत्सुकता चाळवली गेली आहे. कसा आहे ट्रेलर हे जाणून घेण्यासाठी वाचा...

The great indian family trailer out
द ग्रेट इंडियन फॅमिलीचा ट्रेलर रिलीज

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 12, 2023, 3:31 PM IST

मुंबई - The great indian family trailer out : 'जरा हटके जरा बचके'च्या यशानंतर विक्की कौशल आणखी एका फॅमिली ड्रामामध्ये काम करण्यासाठी सज्ज झाला आहे. यशराज फिल्म्स निर्मित 'द ग्रेट इंडियन फॅमिली'मध्ये त्याच्याबरोबर मानुषी छिल्लर रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. विक्कीचे चाहते त्याच्या पुढच्या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. या चित्रपटामधील पहिलं गाणं 'कन्हैया ट्विटर पे आजा' प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांच्या चित्रपटाबद्दल अपेक्षा वाढल्या. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

'द ग्रेट इंडियन फॅमिली'चा ट्रेलर प्रदर्शित :'द ग्रेट इंडियन फॅमिली' चित्रपटाचा ट्रेलर एक मिनिट पंचावन्न सेकंदाचा आहे. या चित्रपटात विक्कीचं नाव वेद व्यास त्रिपाठी असून तो पंडित कुटुंबातील आहे. भजन हा एक सुप्रसिद्ध भक्ती गायक आहे. या व्यवसायामुळं त्याला स्वतःचं प्रेमपात्र शोधण्यात त्रास होतो. ट्रेलरमध्ये अचानक मानुषीची एंट्री दाखवण्यात आलीय. त्यानंतर मानुषी ही विक्कीबरोबर डान्स करताना दिसत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये त्याच्या कुटुंबाला एका अज्ञात स्त्रोताकडून एक पत्र मिळतं, ज्यामध्ये भजन मुस्लिम कुटुंबातील असल्याचा दावा केला जातो. ही गोष्ट समजताच त्याच्या कुटुंबाला धक्का बसतो. त्यानंतर कुटुंबात अनेक मतभेद होताना दिसतात. विक्की उर्फ भजन कुमारला घरातून बाहेर काढलं जातं. ट्रेलरच्या शेवटी विक्की हा चित्रपट कधी रिलीज होणार हे सांगताना दिसतोय.

चित्रपटाची स्टारकास्ट :'द ग्रेट इंडियन फॅमिली' चित्रपटामध्ये विक्की कौशल स्थानिक संगीतकार भजन कुमारची भूमिका साकारताना दिसतोय. विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित हा चित्रपट 22 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. 'द ग्रेट इंडियन फॅमिली' चित्रपट 'यशराज फिल्म्स' निर्मित आहे. 'द ग्रेट इंडियन फॅमिली' हा एक कौटुंबिक मनोरंजन चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये विक्की कौशल आणि मानुषी छिल्लर व्यतिरिक्त मनोज पाहवा, कुमुद मिश्रा, सादिया सिद्दीकी, अलका अमीन, सृष्टी दीक्षित, भुवन अरोरा, आशुतोष उज्ज्वल, भारती पेरवानी आदी कलाकार आहेत.

हेही वाचा :

  1. Welcome to the Jungle Controversy: अक्षय कुमार स्टारर 'वेलकम 3'चं शूटिंग झालं बंद ; जाणून घ्या कारण...
  2. Ayushmann khurrana : आयुष्मान खुरानानं व्यक्त केली 'ही' इच्छा ; जाणून घ्या...
  3. Kareena Kapoor Khan : करीना कपूर खाननं लग्न आणि मुलाच्या नावाच्या वादावर केला खुलासा...

ABOUT THE AUTHOR

...view details