हैदराबाद- Rashmika Mandannas next film : रश्मिका मंदान्नानं तिच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगला हैदराबादमध्ये सुरुवात केली आहे. 'द गर्लफ्रेंड' असे शीर्षक असलेल्या या चित्रपटाचा मूहुर्त करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध निर्माता अल्लू अरविंद, एसकेएन, दिग्दर्शक साई राजेश, मारुती, पवन सदिनेनी आदी मान्यवरांनी हजेरी लावली होती.
अल्लू अरविंद यांनी क्लॅप देऊन शुटिंगला सुरुवात केली. यावेळी स्क्रिप्ट दिग्दर्शकाच्या हाती देत असताना उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. रश्मिका मंदान्नाचा हा 24 वा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची घोषणा गेल्या महिन्यात करण्यात आली होती. या चित्रपटातील तिचा लूकही यावेळी प्रसिद्ध करण्यात आला होता.
ऑक्टोबरमध्ये गर्लफ्रेंड चित्रपटाचं लॉन्च करताना इन्स्टाग्रामवर लिहिले होते, "हे जग महान प्रेमकथांनी भरलेले आहे, परंतु अशा काही प्रेमकथा आहेत ज्या यापूर्वी ऐकल्या नाहीत किंवा पाहिल्याही नाहीत आणि यापैकीचं एक आहे 'द गर्लफ्रेंड'."
रश्मिकाच्या पात्राची एक झलक देखील यावेळी दाखवण्यात आली होती. ज्यामध्ये ती पाण्याखाली श्वास घेत असल्याचे दिसते. ती तणावग्रस्त दिसत असताना, एक क्षण असा येतो जेव्हा तिचा श्वास सुटतो. राहुल रवींद्रन हा या अनोख्या प्रेमकथेचा लेखक आणि दिग्दर्शक आहे. तर या चित्रपटाला श्रीनिवास कुमार नायडू, विद्या कोप्पिनेदी आणि धीरज मोगिलेनी यांनी फायनान्स केला आहे. अल्लू अरविंद हे गीता आर्ट्स बॅनरखाली हा चित्रपट सादर करत आहेत. या चित्रपटाचे संगीतकार हेशम अब्दुल वहाब असणार आहेत.