मुंबई - The Girlfriend First Look: साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना सध्या खूप चर्चेत आहे. रश्मिकानं 'गीता गोविंदम', 'डियर कॉम्रेड' आणि 'पुष्पा' यासारख्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. दरम्यान रश्मिकाच्या आगामी 'द गर्लफ्रेंड' चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात रश्मिका एका वेगळ्या आणि थरारक भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटामधील फर्स्ट लूकमध्ये रश्मिका पाण्यात बुडताना दिसत आहे. 'द गर्लफ्रेंड'मधील फर्स्ट लूक शेअर करताना रश्मिकानं लिहलं, 'हा चित्रपट एक असामान्य आणि रोमांचक प्रेमकथा असणार आहे'. यात रश्मिका मुख्य भूमिकेत आहे. फर्स्ट लूक व्हिडिओमध्ये ती गुलाबी रंगाचा सलवार सूट घालून पाण्यात डुबकी मारताना दिसत आहे.
'द गर्लफ्रेंड'मधील रश्मिका मंदान्ना फर्स्ट लूक रिलीज : या चित्रपटाची टीझर खूपच प्रभावी आहे. 'द गर्लफ्रेंड'बद्दल चाहत्यांनाही उत्सुकता वाढू लागली आहे. या चित्रपटाशी संबंधित उर्वरित स्टारकास्टबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. रश्मिका ही बॉलिवूडमधील अनेक चित्रपट करत आहे. 'द गर्लफ्रेंड' हा चित्रपट रोमांचक प्रेम कथेवर आधारित असणार आहे. या चित्रपटाची शुटिंग ही लवकरच सुरू होणार आहे. या चित्रपटात प्रेमकथेशिवाय काही रहस्येही पाहायला मिळणार आहेत.