महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Tum Kya Milen song out : रॉकी और रानी की प्रेम कहानीतील 'तुम क्या मिलें' हे पहिले रोमँटिक गाणे रिलीज - Tum Kya Milen is released

करण जोहर दिग्दर्शित रॉकी और राणी की प्रेम कहानी चित्रपटातील तुम क्या मिलें हे पहिले रोमँटिक गाणे रिलीज झाले आहे. अरिजीत सिंगने गायलेल्या या सुंदर गाण्यात आलिया आणि रणवीर सिंगचा बहारदार रोमान्स पाहायला मिळतो.

Tum Kya Milen is released
'तुम क्या मिलें' हे पहिले रोमँटिक गाणे रिलीज

By

Published : Jun 28, 2023, 12:34 PM IST

मुंबई - निर्माता दिग्दर्शक करण जोहर ६ वर्षानंतर पुन्हा दिग्दर्शन करतोय. रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाचा टीझर काही दिवसापूर्वी रिलीज झाल्यानंतर या चित्रपटात भव्यता, झगमगाट किती आहे याची कल्पना एव्हाना प्रेक्षकांनी आली होती. आता या चित्रपटातील तुम क्या मिलें हे पहिले गाणे रिलीज करण्यात आलंय.

रॉकी और रानी की प्रेम कहानी या शीर्षकावरुनच हा चित्रपट एक लव्ह स्टोरी असल्याचे स्पष्ट आहे. मात्र एखादी कथा करण जोहर जेव्हा पडद्यावर मांडतो तेव्हा ती भव्य आणि लार्जर दॅन लाईफ असते. याचा प्रत्यय हे गीत पाहताना आल्या शिवाय राहात नाही. अरजिंत सिंगचे काळजाला भिडणारे आर्त स्वर, अमिताभ भट्टाचार्य यांनी शब्दबद्ध केलेली सुंदर रचना आणि प्रतीम यांनी चढवलेला संगीताचा साज असेल तर गाणे सर्व सीमा पार करुन जाणार हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

तुम क्या मिलें हे गाणे रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्यावर चित्रीत झालंय. नेत्र सुखाद बर्फाळ प्रदेशातील रोमँटिक वातावरण, रिमझीम बरसणारा बर्फ आणि उत्साही रॉकी आणि राणी हे तरुण जोडपे यात पाहायला मिळते. या गाण्यात दोघांचाही रसरशीत रोमँटिकपणा, ताल धरायला लावणारा ठेका आणि निसर्गाचा सुंदर देखावा मंत्रमुग्ध करणारा आहे.

निर्माता करण जोहरने हे गीत आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलंय. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'कोणतीही प्रेमकथा एका समर्पक प्रेमगीतासाठी पात्र आहे! आणि मी धन्य आहे की तुम क्या मिलें हे गीत आमच्या रॉकी और रानी की प्रेम कहानीसाठी आहे. हे गाणे आता रिलीज झाले आहे. हा चित्रपट २८ जुलै रोजी सिनेमागृहात दाखल होणार आहे'.

गाणे रिलीज झाल्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत अनेकांना या गाण्यातील आलिया आणि रणवीरचा उत्साह आवडलाय. तर काहींना रणवीर सिंग यात ओव्हर अॅक्टींग करतोय, असे वाटते. बर्फ पडत असताना रंगबिरंगी स्वेटरमध्ये रणवीर आपल्याला दिसतोय पण त्याचवेळी आलिया सिफॉनच्या रंगीत साडीत स्विव्हलेसमध्ये थिरकताना दिसते. ही विसंगती प्रेक्षक बोलून दाखवत आहेत.

हेही वाचा -

१.Dharmendra's emotional moment : धर्मेंद्र यांनी सादर केली मन 'व्याकुळ' करणारी कविता, पाहा अनुपमने शेअर केलेला व्हिडिओ

२.Samantha Ruth Prabhu : सिटॅडेलचे शूटिंग शेड्यूल पूर्ण केल्यानंतर समंथा घेतेय सुट्टीचा आनंद, शेअर केले सुंदर फोटो

३.Adipurush box office collection day 12: रूपेरी पडद्यावर 'आदिपुरुष' चित्रपटाची वाईट परिस्थिती

ABOUT THE AUTHOR

...view details