महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Le Aunga Song : 'सत्यप्रेम की कथा' चित्रपट रिलीज झाल्यानंतर तीन दिवसांनी चित्रपटातील नवीन गाणे रिलीज... - ले औंगा

'सत्यप्रेम की कथा' रिलीज झाल्यानंतर तीन दिवसांनी या चित्रपटातील 'ले आऊंगा' हे नवीन गाणे रिलीज करण्यात आले आहे. हे रोमँटिक गाणे अरिजित सिंगने गायले असून या गाण्याला संगीत तनिष्क बागचीने दिले आहे.

Le Aunga Song
ले औंगा गाणे

By

Published : Jul 1, 2023, 3:49 PM IST

मुंबई: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी स्टारर चित्रपट 'सत्यप्रेम की कथा' हा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता नुकतेच या चित्रपटाचे एक गाणे सोशल मीडियावर झपाटयाने व्हायरल होत आहे. या गाण्याला अरिजित सिंगने गायले आहे. सोशल मीडिया अकाउंटवर या गाण्याची झलक चाहत्यासमोर आल्यानंतर या गाण्याला फार जास्त पसंत केल्या जात आहे. तसेच कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यनने देखील त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर या गाण्याची झलक चाहत्यांसह शेअर केली आहे.

इंस्टाग्रामवर शेअर केले गाणे : इंस्टाग्रामवर गाणे शेअर करताना कार्तिकने लिहिले की, 'तुम्हा सर्वांच्या मागणीनुसार, अरिजितच्या आवाजातील 'ले औंगा' हे नवीन गाणे रिलीज करण्यात आले आहे. चित्रपटाच्या अल्बममधील माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक. कियाराने तिच्या इंस्टा वर गाणे पोस्ट करताना 'शिकवे सबी भूलके, नये रास्ते बनाके, दिल में तुझे बसके, ले आऊंगा' गाणे आऊट नाऊ'. असे कॅप्शन देखील लिहिले आहे.

गाण्याला प्रेक्षकांची पसंती : दरम्यान , कार्तिक-कियाराच्या चाहत्यांना हे नवीन गाणे खूप आवडत आहे. कार्तिकच्या पोस्टवर एका चाहत्याने कमेंट केली, 'इतका परफेक्ट माणूस कोणीही असू शकत नाही'. तर दुसऱ्या एकाने म्हटले, 'जेव्हा तुमचा आवडता गायक तुमच्या आवडत्या अभिनेत्यासाठी गाणे गातो तेव्हा अशी जादू असते'. 'सत्यप्रेम की कथा'च्या उर्वरित गाण्यांनाही रसिकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. पसुरीचा रिमेक सोडला तर 'नसीब से', 'आज के बाद', 'सुन सजनी' आणि गुज्जू पताका या गाण्यांना खूप पसंती दिली जात आहे. सत्यप्रेम की कथा हा राष्ट्रीय पुरस्कार विजेते समीर विद्वांस दिग्दर्शित संगीतमय रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. यात कार्तिक कियाराशिवाय गजराज राव, सुप्रिया पाठक आणि राजपाल यादव यांच्याही भूमिका आहेत. तसेच हा चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीच ब्लॉकबस्टर सोशल मीडियावर घोषीत करण्यात आला होता. या चित्रपटाचे रिव्ह्यू प्रेक्षक फार चांगले देत आहे. त्यामुळे हा चित्रपट बघायला फार जास्त प्रमाणात प्रेक्षकवर्ग जात आहे.

हेही वाचा :

  1. Mukhesh ambani gifted gold cradle : मुकेश अंबानीने राम चरणच्या मुलीला १ कोटी रुपयांचा सोन्याचा पाळणा दिला भेट
  2. BOX OFFICE COLLECTION DAY 2 : 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाच्या कमाईचा वेग बॉक्स ऑफिसवर मंदावला
  3. Parineeti and Raghav potted : परिणीती आणि राघव चढ्ढा अमृतसर विमानतळावर दाखल, जोडपे श्री हरमंदिर साहिबला देणार भेट

ABOUT THE AUTHOR

...view details