महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

movie Teen Adakoon Sitaram : ‘तीन (अडकून) सीताराम’ म्हणताहेत ‘दुनिया गेली तेल लावत’! - The energetic song Duniya Geli Tel Lavat

movie Teen Adakoon Sitaram : 'तीन अडकून सीताराम' मधील 'दुनिया गेली तेल लावत’ हे एनर्जेटिक गाणे रिलीज करण्यात आलंय. तीन बिनधास्त मित्रांचे बिनधास्त असलेलं हे गाणं ताल धरायला लावणारं आहे. येत्या २९ सप्टेंबरला 'तीन अडकून सीताराम' हा चित्रपट प्रदर्शित होईल.

movie Teen Adakoon Sitaram
तीन अडकून सीताराम

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 20, 2023, 5:31 PM IST

मुंबई - movie Teen Adakoon Sitaram: आपल्या चित्रपटांमध्ये संगीताचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. गाण्याचे बोल गाणे हिट होण्यासाठी महत्वाचे असतात. पूर्वी काव्यमय गीते पसंत केली जायची परंतु आता बोली भाषेतील शब्द, वाक्प्रचार वापरून गाणी बनविली जातात आणि ती हिटही होतात. किंबहुना हल्ली प्रत्येक चित्रपटात असे फटाक गाणे असतेच आणि ते बऱ्याचदा सुपरहिट ठरत असते. 'तीन अडकून सीताराम' मधील 'दुनिया गेली तेल लावत’ हे एनर्जेटिक गाणे देखील याच पठडीत मोडणारे आहे. चित्रपटात 'दुनिया गेली तेल लावत’ हे गाणे तीन बिनधास्त मित्रांचे बिनधास्त गाणे असून त्यातून त्यांच्या जगण्याची बेफिकिरता अभिप्रेत होते.



हल्लीच 'तीन अडकून सीताराम' या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले होते आणि आता त्यातील 'दुनिया गेली तेल लावत' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. परदेशात फिरायला गेलेल्या तीन मित्रांचे कथानक या चित्रपटात आहे. गाण्यातून ते किती मौजमस्ती आणि धमाल करताहेत हे दिसून येते. जगाची पर्वा न करता जगणाऱ्या मित्रांची लंडन मध्ये मुंबईत वागतात तसेच वागल्यामुळे काय दैना होते हे चित्रपटातून दर्शविण्यात आले आहे.


'तीन अडकून सीताराम' मधील 'दुनिया गेली तेल लावत' या गाण्याचे बोल लिहिले आहेत वैभव जोशी आणि ॲग्नेल रोमन यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. तर जयदीप वैद्य, गोपाळ ठाकरे, हृषिकेश रानडे आणि आरती केळकर यांनी स्वरसाज चढविला आहे. चित्रपटातील प्रमुख कलाकार वैभव तत्ववादी, अलोक राजवाडे, संकर्षण कऱ्हाडे आणि प्राजक्ता माळी यांच्यावर ते चित्रीत करण्यात आले आहे. प्रसिद्ध कोरिओग्राफर फुलवा खामकर यांनी या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे.


चित्रपटाचे दिग्दर्शक ऋषिकेश जोशी म्हणाले की, ' ‘दुनिया गेली तेल लावत’ या गाण्याची गम्मत म्हणजे ते शूट करताना आम्ही तेच म्हणत होतो. लंडन ला पाय ठेवल्या ठेवल्या न्यूज आली की इंग्लंड ची राणी एलिझाबेथ चे ९६ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे आणि संपूर्ण देश १० दिवसांचा दुखवटा पाळणार आहे. एकतर आम्ही परदेशात शूटिंगला आलो होतो आणि एक एक दिवस आमच्यासाठी किमतीचा होता, अक्षरशः. त्यामुळे नवीन लोकेशन्स शोधली, जे तिकडचे टेक्निशियन्स तयार होते आणि आमचा तुटपुंजा लवाजमा घेऊन, काही ठिकाणी लपत छपत, चित्रीकरण पूर्ण केले. हा अनुभव न विसरता येणारा आहे.'

ABOUT THE AUTHOR

...view details