महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

The Broken News 2 : न्यायासाठी संघर्ष करण्यास राधा सज्ज, श्रियाने शेअर केले द ब्रोकन न्यूज 2 च्या सेटवरील फोटो - Shriya Pilgaonkars character fight for justice

अभिनेत्री श्रिया पिळगावकरने 'द ब्रोकन न्यूज'च्या दुसऱ्या सीझनवर काम करण्यास सुरुवात केली आहे. तिने शोच्या सेटवरील बीटीएस फोटो शेअर केली आहेत ज्यात ती जयदीप अहलावत आणि सोनाली बेंद्रे यांच्यासोबत आहे.

द ब्रोकन न्यूज 2 च्या सेटवरील फोटो
द ब्रोकन न्यूज 2 च्या सेटवरील फोटो

By

Published : Apr 20, 2023, 4:20 PM IST

मुंबई - अभिनेत्री श्रिया पिळगावकरने 'द ब्रोकन न्यूज'च्या दुसऱ्या सीझनवर काम करण्यास सुरुवात केली असल्याचे चाहत्यांना कळवलंय. तिने मालिकेच्या सेटवरील बीटीएस फोटो शेअर केले आहेत. यात जयदीप अहलावत आणि सोनाली बेंद्रे देखील दिसत आहेत.

या मालिकेत अभिनेत्री श्रिया पिळगावकर पत्रकाराची भूमिका साकारत आहे. पहिल्या सीझनमध्ये तिच्या चारित्र्यावर चुकीचा आरोप लावला जातो पण दुसऱ्या सीझनमध्ये ती तिच्या सर्व शक्तीनिशी व्यवस्थेविरुद्ध लढताना दिसेल.द ब्रोकन न्यूज ही 2022 ची भारतात गाजलेली हिंदी वेब सिरीज होती. ही मालिका विनय वायकुल यांनी झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी दिग्दर्शित केली होती. या मालिकेत जयदीप अहलावत, सोनाली बेंद्रे, श्रिया पिळगावकर, जय उपाध्याय, इंद्रनील सेनगुप्ता, तारुक रैना, आकाश खुराना आणि किरण कुमार यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या.

या मालिकेत दोन वृत्त वाहिन्या 'आवाज भारती' आणि 'जोश 24/7' यांच्यातील शत्रूत्व आणि ब्रेकिंग न्यूजसाठी असलेली स्पर्धा दाखवण्यात आली होती. प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय ठरलेल्या या मालिकेचा आता दुसरा भाग प्रवाहित होत आहे. या बद्तीदल बोलताना श्रिया पिळगावकर म्हणाली: 'माझे पात्र राधा पुन्हा धमाकेदारपणे परत आले आहे आणि तिच्यावर चुकीचा आरोप करणार्‍या व्यवस्थेशी लढा देण्याच्या मिशनवर ती आहे. या सीझनमध्ये ती पुढे काय करणार आहे याबद्दल ती खूप अनभिज्ञ आहे ज्यामुळे माझ्यासाठी हे सर्व अधिक मनोरंजक असेल. एक अभिनेत्री म्हणून मी ही भूमिका साकारत आहे. यात काही सरप्रयझेस आहेत आणि मी आत्ताच त्याबद्दल बोलू शकत नाही, परंतु मला खरोखरच सीझन 2 ने किक मारली आहे.'

'द ब्रोकन न्यूज'च्या सीझन 1 साठी मिळालेल्या प्रेमामुळे मी खूप आनंदी आणि कृतज्ञ आहे, जे देशातील विविध न्यूज चॅनेल दैनंदिन भाषण कसे कॅप्चर करतात याचा एक स्तरित, मानवी शोध यात घेतला गेला आहे. सीझन 2 मध्ये, कथा अधिक उत्कंठावर्धक आणि पकड घेणारी आहे जिथे तुम्ही खूप ट्विस्ट्सची अपेक्षा करू शकता. आमच्या लेखन टीमने सीझन 2 मध्ये शोधलेल्या वेगवेगळ्या थीम आणि कथांसह अविश्वसनीय काम केले आहे', असा श्रियाने अखेर निष्कर्ष काढला.

हेही वाचा - Sari Trailer Released: ऐन उन्हाळ्यात बरसणार शीतल 'सरी', ट्रेलर प्रदर्शित!

ABOUT THE AUTHOR

...view details