मुंबई - The Archies trailer out : झोया अख्तरचा 'द आर्चीज' हा चित्रपट जाहीर झाल्यापासून खूप चर्चेत आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर आज गुरुवारी रिलीज झाला. 7 डिसेंबर रोजी, हा चित्रपट नेटफ्लिक्सवर स्ट्रीमिंग होणार आहे. या चित्रपटामध्ये सुहाना खान, खुशी कपूर , वेदांग रैना, मिहिर आहुजा, अदिती डॉट, युवराज मेंडा, तारा शर्मा आणि अगस्त्य नंदा हे कलाकर आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अनेकजण या चित्रपटासाठी खूप आतुर आहेत. याआधी या चित्रपटाचे पोस्टर, टीझर आणि गाण्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते. या चित्रपटाचा ट्रेलर खूप सुंदर आहे. ट्रेलरमध्ये स्टार किड्सचा जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळत आहे.
'द आर्चीज' ट्रेलर रिलीज :ट्रेलरमध्ये सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा, बाकी इतर कलाकारांसह, नाचत आणि आनंद लुटताना दिसत आहेत. 'द आर्चीज' हा चित्रपट नव्या युगाचा म्यूझिकल चित्रपट आहे. चित्रपटाची कहाणी मैत्री, स्वातंत्र्य प्रेम आणि बंडखोरीवर आधारित आहे. सुहाना खान रुपेरी पडद्यावर या चित्रपटाद्वारे पदार्पण करत आहे. या चित्रपटासाठी ती उत्सुक आहे. नुकत्याच झालेल्या संभाषणादरम्यान, झोयानं या तरुण कलाकारांवर कौतुकाचा वर्षाव केला. याशिवाय झोयानं सुहाना खानबद्दल बोलताना सांगितल की, 'सुहानाला तिच्या यशाच्या मार्गात फारसे अडथळे येणार नाहीत. तिच्याकडे गायनाची प्रतिभा आहे'.