मुंबई - सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खान रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झालीय. झोया अख्तर दिग्दर्शित 'द आर्चीज' या आगामी टीन म्युझिकल कॉमेडी चित्रपटातून ती मनोरंजन जगतात पदार्पण करत आहे. या चित्रपटात खुशी कपूर, वेदांग रैना, अगस्त्य नंदा, मिहिर आहुजा, युवराज मेंडा आणि अदिती 'डॉट' सैगल यांच्यासह नव्या पिढीच्या तरुणाईची मांदियाळी पाहायला मिळणारेय. सुहाना खानचं स्केटिंग कौशल्य दाखवणारं आणि तिचे वडील शाहरुख खान यांन तिचं कौतुक केलेलं 'द आर्चीज' चित्रपटातील पहिलं गाणं 'सुनोह' लॉन्च करण्यात आलंय.
शाहरुख खानने इंस्टाग्रामवर सुहानाच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाबद्दलचा आपला उत्साह शेअर केलाय. त्यानं सुनोह गाण्यातील एक झलक पोस्ट केली आहे आणि आर्चीजच्या जगाचे वर्णन विलक्षण आणि सुंदर असं केलंय. गाण्यातील "ट्रेडिंग माय शूज इन फॉर व्हील्स अंडर माय पाय" ही ओळ त्याला 'प्रेरणा' देणारी वाटते. शाहरुख खानच्या या पोस्टनं चित्रपटाबद्दल विशेषत: त्याच्या चाहत्यांमध्ये चर्चा आणि अपेक्षा निर्माण केल्या आहेत.
सुनोह या गाण्यात सुहाना खान एका हवेलीत प्रवेश करताना रोलर स्केट्सवर सपाईदारपणे पुढं सरकते आणि तिचा विंटेज लुक दाखवते. या गाण्यातील आपल्या मुलीच्या लूकचं कौतुक करताना शाहरुख स्वतःला रोखू शकला नाही. त्यानं आपल्या पोस्टमध्ये मिश्किल प्रतिक्रिया दिली आणि गाण्याबद्दल आपले प्रेम व्यक्त केले आणि म्हटलं की त्याशिवाय कुटुंबातील सर्वांना रोलर स्केट कसं करावं हे माहितेय.