मुंबई - Birthday celebration :साऊथ अभिनेत्री नयनतारा गेल्या काही दिवसांपासून खूप आनंदात आहे. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मेगा ब्लॉकबस्टर चित्रपट 'जवान'मधून तिनं हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर तिचे चाहते आता जगभर झाले आहेत. सध्या ती 'जवान' चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. आता नुकताच तिनं जुळ्या मुलांचा पहिला वाढदिवस साजरा केला. ती आपल्या मुलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मलेशियातील क्वालालंपूरमध्ये गेली होती. दरम्यान आता नयनतारा आणि विघ्नेशनं यांनी त्यांच्या जुळ्या मुलांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला आहे. उइर आणि उलग हे 26 सप्टेंबर रोजी एक वर्षाची झाली आहेत.
विघ्नेश शिवन शेअर केला फोटो : नयनताराचा पती विघ्नेश शिवननं आता केक कटिंग सेलिब्रेशनचा एक अप्रतिम फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये नयनतारा आणि विघ्नेश खूप खुश दिसत आहे. याशिवाय शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांच्या अवतीभोवती अनेकजण दिसत आहेत. फोटोमध्ये नयनतारानं पांढऱ्या रंगाचं शर्ट आणि निळ्या रंगाचा डेनिम पॅन्ट घातली आहे. याशिवाय तिच्या मुलांनी आणि पतीनं देखील याच रंगाचा शर्ट आणि पॅन्ट परिधान केला आहे. या खास दिवशी, जोडपे त्यांच्या मुलांसह घराबाहेर जाऊन खूप एंजॉय करत आहेत. यापूर्वी नयन देखील काही फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केली होती. या फोटोंवर अनेकजणांनी कमेंट करून तिच्या मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.