मुंबई - Thank You For Coming X review: भूमी पेडणेकर आणि शहनाज गिल यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'थँक यू फॉर कमिंग' हा चित्रपट ६ ऑक्टोबर रोजी देशभर रिलीज झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन करण बुलानी यांनी केलं आहे. निर्माता असलेल्या बुलानी यांनी पहिल्यांदाच दिग्दर्शक म्हणून या चित्रपटासाठी काम केलं. या चित्रपटाच्या रिलीजपूर्वी कलाकारांनी प्रमोशनसाठी खूप मेहनत केली होती. कलाकारांनी अनेक कार्यक्रमांमध्ये हजरी लावून त्यांच्या चाहत्यांना आनंदित केलं आणि त्यांच्याशी संवादही साधला. टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल पासून ते चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगपर्यंत चाहत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर नेटिझन्स आपला प्रमाणिक अभिप्राय सोशल मीडियावर देताहेत. भूमी पेडणेकर आणि तिच्या गर्ल-गँगच्या सेक्स कॉमेडीबद्दल नेटिझन्स काय विचार करताहेत आणि प्रतिक्रिया देतात ते पाहूयात.
मायक्रो-ब्लॉगिंग साइट X या पूर्वीच्या ट्विटरवर एका युजरनं कलाकारांच्या कामाचं खूप कौतुक केलं आहे. त्यानं लिहिलं., 'शहनाजनं माझं हृदय चोरलं आणि भूमीनेही आजवर कधीही आम्हाला निराश केलेलं नाही. सर्व कलाकारांनी त्यांचे उत्कृष्ट परफॉर्मन्स दिले आहेत. 'थँक यू फॉर कमिंग' हा एक मजेदार चित्रपट आहे.'
दुसर्या युजरनं 'थँक यू फॉर कमिंग' चित्रपटाला 4-स्टार दिले आणि ट्विट केले, 'निकाल : बोल्ड आणि मजेशीर. चित्रपट रिलेट करणारा आहे. मजेशीर आहे पण यातील काही प्रसंगात तुमचं डोळं भरुन येऊ शकतात. मैत्री ते प्रेम याचा किशोरवयीन ड्रामा, असं सर्व काही यात आहे. भूमी पेडणेकर आणि शहनाज गिल या फेमिनिस्ट कॉमेडीमध्ये वेगळ्या वाटतात. तुम्हीही पाहा तुम्हालाही चित्रपट आनंद देईल. थँक यू फॉर कमिंग.'
'थँक यू फॉर कमिंग' हा पूर्णतः मजेशीर आहे.भूमी आणि तिच्या पोरींच्या गँगने अक्षरशः राडा केलाय. तर करण बुलानीने दिग्दर्शन पदार्पणात डायरेक्टर म्हणून उत्कृष्ट काम केलं आहे. हा केवळ चित्रपट नाही तर हॅपी एंडिंगच्या गॅरंटीची हमी देणारी ही एक गोळी आहे. मी या चित्रपटाला 4 स्टार देतोय', असे एका युजरनं म्हटलंय.