महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Thangalaan teaser : विक्रम स्टारर 'थंगालन'चा टीझर प्रदर्शित; पाहा व्हिडिओ - थंगालन चित्रपट

Thangalaan teaser : साऊथचा प्रसिद्ध अभिनेता विक्रम सध्या 'थंगालन' या चित्रपटामुळं चर्चेत आहे. आता या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. हा टीझर प्रचंड जोरदार असून या चित्रपटामध्ये विक्रमचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Thangalaan teaser
थंगालन टीझर

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 1, 2023, 3:58 PM IST

Updated : Nov 1, 2023, 4:37 PM IST

मुंबई - Thangalaan teaser : साऊथचा प्रसिद्ध अभिनेता विक्रमचा एक दमदार चित्रपट पुढील वर्षी चित्रपटगृहात दाखल होणार असून त्याची पहिली झलक आज पाहायला मिळाली. 'थंगालन'चा दमदार टीझर आज रिलीज झाला आहे. या चित्रपटात कोलार गोल्ड फील्ड्सची कहाणी दाखवण्यात येणार आहे, जी एका सत्य घटनेवर आधारित आहे. कोणताही संवाद नसलेल्या 1 मिनिट 32 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये विक्रमला पाहून तुम्हाला धक्का बसेल. विक्रमव्यतिरिक्त या चित्रपटामध्ये मालविका मोहनन, पार्वती तिरुवोथु, हरिकृष्णन, मुथु कुमार आणि डॅनियल कॅलटागीरोन हे कलाकार दिसणार आहेत.

'थंगालन' चित्रपटाबद्दल :'थंगालन'चं दिग्दर्शन पा रंजीत यांनी केले आहे. या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी किशोर कुमार यांनी केली आहे. याशिवाय 'थंगालन'ला जी.व्ही. प्रकाश कुमार यांनी संगीत दिलं आहे. चित्रपटाचे शूटिंग 118 दिवसांत पूर्ण झालं आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 26 जानेवारी रोजी तमिळ, तेलुगू, हिंदी, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होईल, हे जाहीर झालंय. विक्रमचा 'थंगालन' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. या चित्रपटामध्ये अप्रतिम अ‍ॅक्शन पाहायला मिळणार आहे. चित्रपटाची कहाणीही वेगळी असणार आहे. विक्रमचे चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी खूप आतुर आहेत.

कसा आहे टीझर : 'थंगालन' चित्रपटाच्या टीझरची सुरुवात विक्रमनं एका सापाला फक्त पिरगळून मारून त्याचे दोन तुकडे केले, इथून होते. याशिवाय टीझरमध्ये किंचाळणं आणि लोकांची कत्तल केली जात असल्याचं दाखवलंय. हा टीझर अनेकांना चकीत करणार आहे. अभिनेता विक्रम हा मणिरत्नमच्या 'पोन्नियिन सेलवन'मध्ये, शेवटचा दिसला होता. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर जबरदस्त हिट झाला होता. लेखक कल्की कृष्णमूर्ती यांच्या तमिळ कादंबरीवर आधारित, या चित्रपटात विक्रमसोबत त्रिशा कृष्णन, ऐश्वर्या राय, शोभिता धुलिपाला,कमल हासन, सारा अर्जुन आणि यासह आणखी काही कलाकार आहेत.

हेही वाचा :

  1. Saba Azad birthday : गर्लफ्रेंड सबा आझादसोबतचे साधे क्षणही हृतिक रोशनला वाटतात जादुई
  2. Ileana D'Cruz Birthday: इलियाना डिक्रूझनं पदार्पणाच्या चित्रपटासाठी जिंकला होता फिल्मफेअर पुरस्कार
  3. Aishwarya Rai Birthday special: 'देवदास'पासून 'PS-I' पर्यंत, ऐश्वर्या रायच्या काही सर्वोत्तम कामगिरीवर एक नजर
Last Updated : Nov 1, 2023, 4:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details