महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Vijay Thalapathy : 'लिओ'च्या यशाचं होणार जंगी सेलेब्रिशन, बॉक्स ऑफिसवर केली 'इतकी' कमाई... - थलपथी विजय

Vijay Thalapathy : थलपथी विजयचा 'लिओ' बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. दरम्यान निर्मात्यांनी चित्रपटाच्या यशाबद्दल भव्य सक्सेस पार्टी आयोजित करण्याची योजना आखली आहे.

Vijay Thalapathy
विजय थलपथी

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 30, 2023, 1:42 PM IST

मुंबई - Vijay Thalapathy : थलपथी विजय आणि दिग्दर्शक लोकेश कनागराज यांचा 'लिओ' रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. लिओ'नं भारतात 300 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. या चित्रपटानं 500 कोटींची कमाई करून जगभरातील बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. 'लिओ'ला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. दरम्यान, दिग्दर्शक लोकेश कनकराज यांनी जाहीर केलंय की, निर्माते लवकरच चित्रपटाच्या यशाबद्दल एक पार्टी आयोजित करणार आहे. 1 नोव्हेंबरला नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्याचा विचार सध्या ते करत आहे.

सक्सेस पार्टी : या सक्सेस पार्टीला थलपथी विजय देखील उपस्थित राहणार आहे. त्यामुळं याठिकाणी मोठी गर्दी होऊ शकते. थलपथी विजयचे चाहते 'लिओ'च्या ऑडिओ लॉन्चची आतुरतेनं वाट पाहत होते. मात्र, काही दिवसांपूर्वी ऑडिओ लॉन्च योजना रद्द करण्यात आली. 'मास्टर'नंतर थलपथी विजय आणि दिग्दर्शक लोकेश कनागराज हे 'लिओ'द्वारे पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. या चित्रपटामध्ये विजय अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. 'लिओ'मध्ये विजय व्यतिरिक्त त्रिशा, संजय दत्त, अर्जुन सर्जा, मायस्किन, सँडी आणि गौतम मेनन, मॅथ्यू थॉमस, मन्सूर अली खान, प्रिया आनंद हे कलाकार आहेत.

'लिओ'ची कमाई : 'लिओ'नं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 64.8 कोटीची कमाई केली. त्यानंतर या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर वादळ निर्माण केलं. या चित्रपटाद्वारे 14 वर्षांनंतर विजय आणि त्रिशा यांची जोडी पडद्यावर एकत्र आली आहे. 'लिओ' हा तमिळ सिनेमातील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. आता हा चित्रपट रिलीजच्या बारव्या दिवसात आहे. रिलीजच्या बारव्या दिवशी 'लिओ' किती कमाई करेल हे जाणून घेऊया...

'लिओ' चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

पहिला दिवस 64.8 कोटी

दुसरा दिवस 34.25 कोटी

तिसरा दिवस 38.3 कोटी

चौथा दिवस 39.8 कोटी

पाचवा दिवस 34.1 कोटी

सहावा दिवस 30.7 कोटी

सातवा दिवस 13.4 कोटी

आठवा दिवस 8.9

आठवडा 1 कलेक्शन 264.25 कोटी

नव्वा दिवस 7.65 कोटी

दहा दिवस 15 कोटी

अकरावा दिवस 16.64 कोटी

बारावा दिवस 6.39 कोटी * कमावू शकतो

'लिओ'चं बॉक्स ऑफिस एकूण 309.93 कोटी होईल

हेही वाचा :

  1. Ananya Panday birthday : सुहाना खान आणि शनायानं 'बेस्टी' अनन्याला दिल्या वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा
  2. Urfi Javed : उर्फी जावेदनं 'भूल भुलैया' चित्रपटातील राजपाल यादवच्या छोटा पंडितच्या पात्राची केली कॉपी...
  3. Chiyaan 62 : तमिळ स्टार चियान विक्रमनं केली 'चियान 62' चित्रपटाची घोषणा ; व्हिडिओ केला पोस्ट

ABOUT THE AUTHOR

...view details