महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

थलपथी विजय स्टारर 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम'चं पोस्टर रिलीज - पोस्टर रिलीज

The Greatest Of All Time Poster:'लिओ' या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर थलपथी विजय आता आगामी 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम'मध्ये अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचं आकर्षक पोस्टर रिलीज झालं आहे.

The Greatest Of All Time Poster
द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम पोस्टर

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 2, 2024, 11:40 AM IST

Updated : Jan 2, 2024, 11:56 AM IST

मुंबई - The Greatest Of All Time Poster : साऊथ अभिनेता थलपती विजयनं वर्षाच्या पहिल्या दिवशी त्याच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. विजयचा आगामी चित्रपट 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटामधील पोस्टर विजयनं सोशल मीडियावर शेअर केलं आहे. थलपती 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम'मध्ये अ‍ॅक्शन करताना दिसेल. शेअर केलेल्या पोस्टरमध्ये विजय एका गाडीवर दुहेरी भूमिकेत बंदुकीतून गोळीबार करताना दिसत आहे. 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम' हा या वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाचं पोस्टर विजयनं 1 जानेवारी रोजी चाहत्यांसाठी शेअर केलं असून या पोस्टवर अनेकजण आता कमेंट्स करत आहे.

'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम'चं पोस्टर रिलीज : या पोस्टवर एका चाहत्यानं लिहिलं, ''विजय पुन्हा एकदा अ‍ॅक्शन करताना दिसणार, मला हा चित्रपट पाहायचा आहे''. दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, ''हा चित्रपट खूप वेगळा असणार आहे, मी नक्कीच 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' चित्रपट पाहणार'' त्यानंतर दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, ''विजयचा हा चित्रपट ब्लॉकबस्टर असणार आहे''. अशा अनेक कमेंट्स पोस्टवर सध्या येत आहेत. काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत. याशिवाय विजयनं 31 डिसेंबर रोजी देखील एक पोस्टर शेअर केलं होतं. तेही चाहत्यांना खूप आवडलं.

'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम' चित्रपटाची स्टारकास्ट : चित्रपट निर्मात्या अर्चना कल्पथी यांनीही त्याच्या एक्स अकाउंटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहिलं की, ''2024 वर्षाची सुरुवात 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम'नं होत आहे. या पोस्टरमध्ये टॅगलाईन खुप सुंदर आहे. 'प्रकाश अंधाराला भस्म करू शकत नाही. परंतु अंधार प्रकाशाला खाऊ शकत नाही''. 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम'चं दिग्दर्शन व्यंकट प्रभू यांनी केलं आहे. या चित्रपटात थलपथी विजयसह प्रभू देवा, माइक मोहन, प्रशांत, स्नेहा, लैला, जयराम, योगी बाबू आणि मीनाक्षी चौधरी यांसारखे कलाकार आहेत. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा :

  1. सोनाली बेंद्रेनं हरिद्वारमध्ये कुटुंबासोबत नवीन वर्ष केले साजरे
  2. अक्षय कुमार आणि ज्युनियर एनटीआरनं आगामी चित्रपटांचे पोस्टर केले शेअर
  3. रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी लवकरच लग्नबंधनात अडकणार
Last Updated : Jan 2, 2024, 11:56 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details