मुंबई - तामिळ अभिनेता थलपथी विजयच्या आगामी लिओ या चित्रपटातील एक गाण्याचा व्हिडिओ नुकताच रिलीज झाला आहे. या गाण्यात तो नृत्य करताना धुम्रपान करताना दिसत आहे. या गाण्यातून त्याने धुम्रपानाचा वापर किंवा गौरव केल्याने विजय कायदेशीर अडचणाीत सापडल्याचे सांगण्यात येत आहे.
अभिनेता विजयवर अंमली पदार्थ नियंत्रण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या ना रेडी गाणे रिलीज झाल्यानंतर हा नवा वाद निर्माण झाला आहे. २२ जून रोजी थलपथी विजयच्या वाढदिवसानिमित्त लिओचे बहुप्रतिक्षित पहिले गाणे ना रेडी रिलीज करण्यात आले होते.
एक टीझर व्हिडिओ आणि त्याच्या बहुप्रतिक्षित लिओ चित्रपटाच्या फर्स्ट लूकने इंटरनेटवर वादळ निर्माण केल्यानंतर विजयच्या चाहत्यांना वाढदिवसाची भेट म्हणून पार्टी गाणे शेअर केले गेले. पेप्पी गाणे स्वतः थलपथीने गायले आहे आणि अनिरुद्ध रविचंदरने संगीतबद्ध केले आहे. हे गाणे आकर्षक आहे आणि डान्सर म्हणून विजयचे कौशल्य यात दाखवण्यात आले आहे.
गाणे रिलीज झाल्यानंतर चाहत्यांनी गाण्यावर आणि विशेषतः विजयवर प्रचंड प्रेम केले. विजय तोंडात सिगारेट घेऊन त्याच्या पाठीमागे मोठ्या डान्स क्रूसोबत जबरदस्त थिरकताना दिसतो. गाण्याच्या शुटिंग दरम्यान सेटवरील काही बीटीएस क्षणांचाही वापर यात करण्यात आला आहे.