महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

५५२ थिएटर्समध्ये 'गांधी' चित्रपटाचे मोफत प्रदर्शन, तेलंगणा सरकारची घोषणा - Chief Minister K Chandrasekhar Rao

तेलंगणा राज्य सरकारने 1982 चा ऑस्कर पुरस्कार विजेता 'गांधी' चित्रपट तेलुगू आणि हिंदीमध्ये राज्यभर प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे. हा चित्रपट राज्यातील विद्यार्थ्यांना मोफत दाखवण्यात येणार आहे. २२ लाख विद्यार्थ्यांना हा चित्रपट पाहता येणार आहे. तेलंगणा राज्यात 9 ते 22 ऑगस्ट दरम्यान 552 चित्रपटगृहात सकाळी 10 ते दुपारी 1:15 या वेळेत गांधी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी केली.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Aug 9, 2022, 11:58 AM IST

हैदराबाद- भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करणाऱ्या 'स्वतंत्र भारत वज्रोत्सवा'चा एक भाग म्हणून तेलंगणा राज्य सरकारने 1982 चा ऑस्कर पुरस्कार विजेता 'गांधी' चित्रपट तेलुगू आणि हिंदीमध्ये राज्यभर प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी ही घोषणा केली.

मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी सोमवारी येथे पंधरा दिवस चालणाऱ्या स्वतंत्र भारत वज्रोत्सवाचे उद्घाटन केले. त्यांनी सांगितले की मंत्री तलासनी श्रीनिवास यादव व मुख्य सचिव सोमेश कुमार यांना लाखो विद्यार्थ्यांना चित्रपट पाहण्याची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. या निमित्ताने विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यलढ्याची माहिती व्हावी, असेही ते म्हणाले.

9 ते 22 ऑगस्ट दरम्यान 552 चित्रपटगृहात सकाळी 10 ते दुपारी 1:15 या वेळेत गांधी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. MAUD चे विशेष मुख्य सचिव अरविंद कुमार यांनी ट्विटरवर सांगितले की, या कार्यक्रमामुळे तब्बल 22 लाख शाळकरी मुलांना स्वातंत्र्य सैनिकांबद्दल माहिती मिळेल. "अभिनेता बेन किंग्सले यांच्या मुख्य भूमिका असलेला रिचर्ड अ‍ॅटनबरो यांचा "गांधी" हा चित्रपट 9 ते 22 ऑगस्ट दरम्यान राज्यभरातील 552 चित्रपटगृहांमध्ये (तेलुगू आणि हिंदी) विनामूल्य प्रदर्शित होत आहे आणि एकूण 22 लाख शालेय मुले हा चित्रपट पाहतील."

हेही वाचा -बहिष्कार 'लाल सिंग चड्ढा' ट्रेंडबद्दल अखेर अक्षय कुमारने सोडले मौन

ABOUT THE AUTHOR

...view details