महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Tejas X review : कंगनाच्या 'तेजस'ला थंड सुरुवात, बॉक्स ऑफिसवर अपेक्षेहून कमी प्रतिसाद - कंगना रणौत

Tejas X review : कंगना रणौतची मुख्य भूमिका असलेला 'तेजस' चित्रपट वाजत गाजत रिलीज झाला. सर्वेश मेवारा दिग्दर्शित या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय. मात्र बॉक्स ऑफिसबाबत सॅकनिल्कचे प्रारंभिक अंदाज फारसे समाधान कारक नाहीत.

Tejas X review
कंगनाच्या तेजसला थंड सुरुवात

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 27, 2023, 2:12 PM IST

मुंबई - Tejas X review : कंगना रणौतच्या 'तेजस' चित्रपटानं आज उड्डाण केलं. सर्वेश मेवारा दिग्दर्शित आणि लिखित 'तेजस' चित्रपट हा तेजस गिल या भारतीय हवाई दलाचा पायलटच्या पराक्रमावर केंद्रीत आहे. प्रत्येक भारतीयामध्ये अभिमानाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आलाय. भारतीय वायुसेनेच्या वैमानिकांच्या अथक समर्पणाचे दर्शन चित्रपटातून घडवतण्यात आलंय.

तेजस एक्स रिव्ह्यू : तेजस हा कंगनाचा महत्त्वकांक्षी चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी पहिल्या दिवशीचा पहिला शो पाहून चित्रपटाबद्दलचं आपलं मत व्यक्त करायला सुरुवात केलीय. सर्वेश मेवाराच्या दिग्दर्शनावर प्रेक्षक फारसे प्रभावित झालेले दिसत नाहीत. चित्रपटाच्या व्हिज्युअल इफेक्ट्सही प्रेक्षकांच्या मनाला फारसे भावलेलं दिसत नाही.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील प्रतिक्रिया खूप संमिश्र आहेत. काही जणांना हा चित्रपट भव्य आणि जबरदस्त वाटतोय, तर काहींना यात बऱ्याच कमजोरी दिसताहेत. काहींनी या एअर कॉम्बॅट थ्रिलरला उपरोधानं कॉमेडी-ड्रामा म्हटलंय. नकारात्मक कमेंट्स येत असल्या तरी यातील कंगनाच्या भूमिकेचं अनेकांनी कौतुक केलंय.

तेजस गिलच्या भूमिकेत कंगना रणौत :

'तेजस'मध्ये कंगनाने तेजस गिल या फायटर जेट पायलटची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन यात काही त्रूटी असताना कंगनाचा करिष्मा आणि कमांडिंग उपस्थितीने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. एक मजबूत आणि निर्भय पायलटची तिनं साकारलेली भूमिका, प्रेरणादायी संवादामुळे प्रभावी ठरली आहे.

तेजसचा बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 1:

इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या अंदाजानुसार 'तेजस' हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर अपेक्षेहून कमी कमाई करु शकतो. या चित्रपटानं पहिल्या दिवशी अंदाजे 50 लाखाची कमाई केली आहे. चित्रपटाच्या पहिल्या दिवशीची सुरुवात खूपच संथ पद्धतीनं झालीय.

कंगनाच्या 'तेजस' कडून निर्मात्यांना व तिच्या चाहत्यांना खूप मोठी अपेक्षा आहेत. गेल्या बऱ्याच काळापासून कंगनाला हिंदी चित्रपटसृष्टीत अपेक्षित यश मिळू शकलेलं नाही. त्यामुळे विकेंडच्या काळात प्रेक्षक थिएटरकडे येतील अशी आशा निर्मात्यांनी बाळगलीय.

भारतातील पहिला एरियल एक्शन चित्रपट म्हणून ओळखला जाणारा 'तेजस' चित्रपटामध्ये 'उरी' प्रमाणेच धमाका होणं अपेक्षित होतं. मात्र प्रेक्षकांच्या या अपेक्षांना चित्रपट उतरलेला नाही. कंगना रणौतच्या मुख्य भूमिकेसह चित्रपटात वरुण मित्रा, अंशुल चौहान आणि आशिष विद्यार्थी प्रमुख भूमिकेत आहेत.

हेही वाचा -

  1. Ranveers Same Tale Of First Meeting : अनुष्का आणि दीपिकांसोबतच्या पहिल्या भेटीचं रणवीरचं वर्णन सेम टू सेम, स्क्रिप्ट बदलण्याचा मिळाला सल्ला

2.Tiger 3 advance booking : 'टायगर 3' च्या आगाऊ तिकीट विक्रीची तारीख जाहीर, चाहत्यांमध्ये उत्साह

3.MAMI Film Festival 2023 : देसी गर्ल प्रियांका चोप्राचं मामी फेस्टीव्हलसाठी आगमन

ABOUT THE AUTHOR

...view details