महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Teaser of Maharashtra Shaheer : मराठमोळ्या शाहिरी गाण्यांची पर्वणी असलेला महाराष्ट्र शाहीरचा टिझर रिलीज - शाहीर साबळे

शाहिर साबळे यांच्या जीवनावर आधारित महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला आहे. अजय अतुलच्या बहारदार संगीताने टिझरमधून एक चैतन्य निर्माण केले आहे.

महाराष्ट्र शाहीरचा टिझर रिलीज
महाराष्ट्र शाहीरचा टिझर रिलीज

By

Published : Mar 20, 2023, 7:33 PM IST

मुंबई- शाहीर साबळे यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या शाहिरी कवनामधून मंत्रमुग्ध केले होते. त्यांच्या खणखणीत आवाजाने महाराष्ट्राला वीररसाने भारावून सोडले होते. त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्याचे स्वप्न त्यांचे नातू केदार शिंदे यांनी मनी बाळगले होते. अनेक दिवसापासून या चित्रपटाची प्रतीक्षा महाराष्ट्रातील तमाम लोक करत आहेत. अखेर या चित्रपटाचा टिझर आज रिलीज करण्यात आला.

टिझरच्या सुरुवातीला बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण, साने गुरूजी, लता मंगेशकर हे शाहिर साबळे यांना प्रोत्साहन देताना दिसतात. त्यानंतर शाहीर साबळे आपल्या साथीदारांसह खंडेरायाचा यळकोट करतात आणि त्यानंतर एकापोठोपाठ एक बहारदार लोकप्रिय गाण्यांची रेचचेल सुरू होते. सर्व प्रकारच्या गाण्ंयाचा उत्तम मेळ यात पाहायला मिळतो. अजय अतुलच्या संगीताने शाहिरांच्या जुन्या गाण्ंयाना पुन्हा नवा बहर आणलेला आहे.

महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी आपल्या निवेदनात रसिकांसाठी लिहिलंय की, ज्यांनी मराठीचा स्वाभिमान आयुष्यभर ज्यांनी जपला आणि मराठी लोकसंगीत लोककला आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यांच्यामुळे पोहोचली ती व्यक्ती म्हणजे 'महाराष्ट्र शाहीर साबळे' हेच नाव आपसूकच ओठावर येते, असे म्हणत त्यांनी मायबाप प्रेक्षकहो तुमच्या चरणी अर्पण, असे लिहिलंय. शाहीर साबळे ह्यांची भव्य जीवनगाथा २८ एप्रिल २०२३ पासून तुमच्या नजीकच्या चित्रपटगृहात पाहायला मिळेल, असेही त्यांनी म्हटलंय.

शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष सुरू आहे. या वर्षात त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘महाराष्ट्र शाहीर' हा बायोपिक रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांचा नातू केदार शिंदे यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा प्रतिमा कुलकर्णी यांनी लिहिली आहे. शाहीर साबळेंच्या बायोपिकमध्ये अंकुश चौधरी शाहीरांची भूमिका साकारत आहे.

लहानपणापासूनच सामाजिक चळवळींशी संपर्कात आल्याने साबळे यांना साने गुरुजी, क्रांतीसिंह नाना पाटील, भाऊराव पाटील, सेनापती बापट अशा दिग्गजांचा सहवास मिलाला. १९४२ची चले जाव चळवळ, स्वातंत्र्यानंतर गोवा आणि हैद्राबाद मुक्तीसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ अशा अनेक आंदोलनात ते सक्रिय होते. आपल्या खड्या आवाजाने त्यांनी लोकांना जागृत करण्याचे काम केले. लोककलेच्या क्षेत्रातही त्यांनी फार मोलाचं योगदान दिले आहे. अशा या महान शाहिरांचा पद्मश्री, संगीत नाटक अकादमी, महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. १८ एप्रिल २०२३ या दिवशी महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट देशभर रिलीज होणार आहे.

हेही वाचा -Jr Ntr Says He Will Quit Films : '...तर चित्रपट करणे सोडून देईन', म्हणताच ज्युनियर एनटीआरच्या चाहत्यांना मोठा धक्का

ABOUT THE AUTHOR

...view details