मुंबई- Tara Sutaria : अभिनेत्री तारा सुतारिया तिच्या आगामी 'अपूर्वा' या चित्रपटामध्ये एक अनोखी भूमिका साकारणार आहे. या भूमिकासाठी तिनं आपलं अभिनय कौशल्य पूर्ण पणाला लावलं होतं. 'अपूर्वा'तील भूमिकेबद्दल बोलताना तिनं एका निवेदनात म्हटलंय की, 'तुम्ही जे काम करत आहात त्यावर प्रामाणिकपणे विश्वास ठेवणं महत्त्वाचंय. मी जेव्हा मी निखिल सर आणि मुराद खेतानी सरांना कथा कथनासाठी भेटले तेव्हापासून 'अपूर्वा' चित्रपटाबद्दल माझा दृढ विश्वास होता. 'अपूर्वा'मध्ये मी जशी आहे त्याचं प्रतिबिंब माझ्या इतर चित्रपटांपेक्षा या भूमिकेत उमटलंय. माझा ज्यावर विश्वास आहे ते प्रेक्षकांना पाहायला आवडेल याची मला खात्री वाटते.'
या चित्रपटाचे कथानक भारतातील सर्वात धोकादायक प्रदेशांपैकी एक असलेल्या चंबळच्या पार्श्वभूमीवर सेट केली गेली आहे, ही एका सामान्य मुलीची कथा आहे जिला प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो. जगण्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. या भूमिकेत फिट बसण्यासाठी ताराने स्वतःमध्ये मूलगामी बदल घडवून आणला. 'अपूर्वा' मधील तिच्या पात्रातील पैलूंना पूर्णपणे मूर्त रूप देण्यासाठी तारानं शॉवर घेण्यासही नकार दिला होता.
तारा सुतारियानं आधी सांगितलं होतं की, 'मला अपूर्वाचा अभिमान आहे कारण मी चित्रपटातील प्रत्येक शॉट स्वतःच शूट केला आहे. कोणतंही निमित्त केलं नाही. जेव्हा आम्ही शूट केले तेव्हापेक्षा मला जास्त ताकद आणि शक्ती कधीच जाणवली नाही.. ( निखील नागेश बट्ट सर यासाठी मी तुमची कायम ऋणी आहे ) मला आठवत आहे की, मी जसं दिसयला हवं तशी दिसावी यासाठी शेड्यूलच्या मध्ये एक आठवड्यापेक्षा जास्त काळ आंघोळ केली नव्हती. मी चिखल आणि राखेत लोळले (हे खरंतर मजेदार होतं) आणि माझे केस ब्रश केले गेले नाहीत असे आठवडे संपले! आम्ही पोस्टर शूट केले तेव्हा मी कशी दिसत होते ते येथे थोडेसे पाहा. खूप प्रेमाबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. आम्ही एक टीम म्हणून भारावून गेलो आहोत. अवि गोवारीकर दिवसभरातील तुमच्या सर्व मदतीबद्दल धन्यवाद.'