अभिनेत्री तनिषा संतोषीचे 'गांधी-गोडसे, एक युद्ध'मधून पदार्पण मुंबई : आजच्या काळात बहुतेक स्टार-किड्स रूढीवादी ग्लॅमरस पदार्पणासाठी जात असताना, तनिषा संतोषीने अतिशय गंभीर आणि संवेदनशील विषयाभोवती फिरणाऱ्या प्रायोगिक शैलीमध्ये, एक अद्वितीय आणि मनोरंजक पात्र असलेल्या चित्रपटांमध्ये पाऊल टाकण्याचे धाडसी पाऊल उचलले आहे. 'गांधी गोडसे - एक युद्ध' सोबत मनोरंजनाच्या दुनियेत प्रवेश करत, ज्येष्ठ चित्रपट निर्माते राजकुमार संतोषी यांची कन्या तनिषा संतोषीने ऐतिहासिक घटनांच्या काल्पनिक मनोरंजनासह उत्कृष्ट अभिनयात पदार्पण केले. चला तर पाहूयात मग अभिनेत्री तनिषा संतोषी काय म्हणाली.
1. तुमचा गांधी गोडसे एक युद्ध हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तुला कसे वाटत आहे? :चित्रपट रिलीज होण्यापूर्वी मला खूप काळजी वाटत होती, पण मला आता छान वाटत आहे. मला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. मी तुम्हाला पुन्हा लवकरच भेटण्यासाठी खूप उत्सुक आहे. चित्रपट प्रदर्शनानंतर मला खूप सकारात्मक फिडबॅक मिळाला. 2. हा चित्रपट खूप चर्चेत आहे. या चित्रपटाला वादग्रस्त चित्रपट असेही म्हटले जात आहे. या विषयावर तुमचे मत काय आहे? : चित्रपटात काहीही वादग्रस्त नाहीये. हा चित्रपट खूप जबाबदारीने बनवला आहे. आम्ही एका साइडला प्रोपागेट केले नाहीये.
3. या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार आहेत. त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? : माझ्या चित्रपटातील कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता. दीपक अंतानी यांनी गांधीजींची भूमिका साकारली आहे. मला खूप काही शिकायला मिळाले. माझे शुटींग नसतानाही मी सेटवर जायचे. चित्रपटातील दिग्गज कलाकारांच्या कामाचे निरीक्षण करायचे. मी आशा करते की, अशी संधी मला पुन्हा मिळेल.
4. दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? : वडीलांसोबत काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता. ते खूप चांगले दिग्दर्शक आहे. लहानपणापासून मी त्यांचे काम पाहत आले आहे. त्यांनी अनेक स्टार्सना दिग्दर्शित केले. आता त्यांनी मला दिग्दर्शित केले, तो क्षण माझ्यासाठी खूप खास होता. सेटवर माहोल खूप चांगला होता. मी खूप महत्वाकांक्षी मुलगी आहे. साहजिकच मला प्रेक्षकांचे प्रेम हवे आहे. प्रेक्षकांनी माझा अभिनय स्वीकारावा. मला आशा आहे की, प्रेक्षकांना माझे काम आवडेल. हा सामान्य प्रकारचा चित्रपट नाही. हा चित्रपट नॉन ग्लॅमरस चित्रपट आणि कामगिरीवर आधारित आहे. 5. या चित्रपटादरम्यान घडलेला एखादा मजेदार किस्सा किंवा एखादा क्षण : या चित्रपटात एक भजन आहे. तो सीन माझ्यासाठी खूप खास होता. त्या सीनसाठी मी खूप सराव केला. त्यात एक सरगम आहे जे खूप अवघड आहे. माझ्यासाठी तो खूप छान अनुभव होता. ए आर रहमान यांनी संगीत दिले आहे आणि श्रेया घोषाल यांनी गायले आहे. त्यामुळे ते माझ्यासाठी खूप खास होते.
हेही वाचा :Nargis Fakhri Exclusive : अभिनेत्री नरगिस फाकरीचा चार वर्षानंतर कमबॅक, ईटीव्ही भारतशी संवाद साधताना म्हणाली - 'मला मोठ्या पडद्यावर...'