चेन्नईTamil Actor Babu Passed Away :तामिळ चित्रपटसृष्टीसाठी मंगळवारचा (१९ सप्टेंबर) दिवस अत्यंत दुःखाचा ठरला. इंडस्ट्रीनं एक अनुभवी आणि बहुमुखी अभिनेता गमावला. प्रसिद्ध तमिळ अभिनेते 'बाबू' यांचं मंगळवारी निधन झालं. बाबू अपघातानंतर बराच काळ अंथरुणाला खिळले होते. त्यांच्या निधनानं तामिळ चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. चित्रपटसृष्टीतील सर्व स्टार्सनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय.
बाबू कोण आहेत :१९९० च्या दशकात प्रसिद्धी मिळालेल्या बाबूनं सहाय्यक दिग्दर्शक म्हणून प्रवास सुरू केला होता. सुरुवातीला त्यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक भारतीराज यांच्यासोबत काम केलं. १९९० मध्ये त्यांच्या नशिबानं कलाटणी घेतली. भारतीराजनं त्यांना 'एन उईर थोजन' या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी कास्ट केलं. या चित्रपटातील उस्ताद इलायराजा यांनी रचलेलं 'कुयलु कुप्पम कुइलु कुप्पम गोपुरम अनाथेन्ना' या गाण्याला तमिळ सिनेप्रेमींचं खूप प्रेम मिळालं. त्यानंतर त्यांनी पेरम पुल्ली (१९९१), थायम्मा (१९९१) आणि पोन्नुक्कू सेठी वंथाचू (१९९१) सारख्या चित्रपटांद्वारे मनोरंजक ग्रामीण कथा पडद्यावर आणल्या.
चित्रीकरणादरम्यान झाला अपघात : बाबू दाक्षिणात्य सिनेसृष्टीत फार सक्रिय होते. तेथे त्यांनी आपल्या अभिनयाच्या बळावर बरीच ओळख मिळवली. 'मानसरा परहितंगलें (१९९१) या चित्रपटात त्यांनी काम करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानं त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलली. 'मनसरा वाजाथुंगलेनच्या चित्रीकरणादरम्यान बाबूंचा अपघात झाला. बाबू यांनी या सीनबद्दल सांगितलं होतं की, हे स्टंट डबल्स किंवा सुरक्षेची खबरदारी न घेता केले पाहिजे. शूटिंग करताना त्यांनी उडी मारली असता, त्यांचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या पाठीला गंभीर दुखापत झाली. यानंतर ते तब्बल ३० वर्ष अंथरुणाला खिळून राहिले.
चेन्नईतील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला : अनेक उपचारांनंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. या कठीण काळात बाबूंच्या आईनं त्यांची काळजी घेतली. नुकतंच त्यांचं निधन झालं. काही दिवसांपूर्वी बाबूंची प्रकृती खालावली. त्यांना उपचारासाठी चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र मंगळवारी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली आणि त्यांचं निधन झालं. दिग्दर्शक भारतीराज यांनी बाबूच्या कारकिर्दीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी बाबूंच्या निधनावर शोक व्यक्त केलाय.
हेही वाचा :
- SS Rajamouli announces Made in India : एसएस राजामौलींनी केली 'मेड इन इंडिया'ची घोषणा, बनवणार दादासाहोब फाळकेंचा बायोपिक
- Rishi Kapoor advises Nana Patekar : ऋषी कपूरने नाना पाटेकरला दिला होता अॅक्टिंग सोडण्याचा सल्ला, का ते जाणून घ्या...