महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Tamannaah Bhatia Maldives vacay : तमन्ना भाटियाने सोशल मीडियावर मालदीव व्हॅकेशनमधील फोटो केली शेअर... - Tamannaah Bhatia

Tamannaah Bhatia Maldives vacay: तमन्ना भाटिया सध्या मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे. तमन्ना आणि विजय वर्मा नुकतेच मुंबई विमानतळावर दिसले होते.

Tamannaah Bhatia Maldives vacay
तमन्ना भाटिया

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 31, 2023, 6:14 PM IST

Tamannaah Bhatia Maldives vacay: बी-टाउनचे लव्हबर्ड्स तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. तमन्ना ही शेवटी 'जेलर' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटामधील 'कवला' गाणे हे खूप हिट झाले. तसेच 'जेलर'ने 600 कोटींहून अधिक व्यवसाय बॉक्स ऑफिसवर केला आहे. दरम्यान आता तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा हे मालदीवच्या सुट्टीचा आनंद घेत आहेत. दोघेही नुकतेच मुंबई विमानतळावर दिसले होते. आता हे कपल मालदीवला गेल्याचे समजत आहे. तमन्नाने तिच्या मालदीवच्या सुट्टीतील काही हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो विजय वर्माने क्लिक केले असावे असा अंदाज बांधला जात आहे.

फोटो केली शेअर :समुद्रकिनारी हे कपल वेळ घालवताना दिसत आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाची बिकिनी घातला आहे. दुसऱ्या फोटोमध्ये ती समुद्रकिनारी पडलेल्या वाळूशी खेळत आहे. तिसर्‍या फोटोत ती कॉफी कलरच्या टॉपमध्ये अभी आहे. चौथ्या फोटोमध्ये ती हातात चहा कप घेऊन दिसत आहे. तर, पाचव्या फोटोत तमन्नाने टोपी घातलेली आहे आणि सहाव्या फोटोत ती आराम करताना दिसत आहे. सोशल मीडियावर तिने हे खास फोटो शेअर करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. हे फोटो शेअर करत तिने तीन इंद्रधनुष्य लोगो पोस्ट केला आहेत. तमन्नाच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करत आहे.

फोटोवर चाहत्यांनी केल्या कमेंट : या फोटोवर कमेंट करत एका चाहत्याने लिहले, 'विजय वर्मा तुझे फोटो क्लिक करतोय, पण त्याचा एकही फोटो नाही'. दुसऱ्याने लिहले, 'विजय भाई कुठे आहे?' आणखी एकाने लिहले, 'तमन्ना तुझे फोटो खूप छान आहेत', अशा अनेक कमेंट या पोस्टवर येत आहेत. काही चाहते तिच्या पोस्टला लाईक करत आहेत. तमन्नाच्या या फोटोंना 4 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तमन्ना भाटियाच्या फॉलोअर्सनी विजय वर्माला देखील कमेंट विभागात टॅग करत सुंदर क्लिकसाठी त्याचे कौतुक केले. या कपलनी 'लस्ट स्टोरीज 2' मध्ये एकत्र काम केले आहेत. या वेब सीरिजच्या सेटवर त्यांची प्रेमकहाणी बहरली.

हेही वाचा :

  1. Jawan trailer viewers reaction : 'जवान'च्या रोमांचक ट्रेलरवर प्रेक्षकांच्या उत्स्फुर्त प्रतिक्रिया
  2. Nayanthara Instagram Debut : नयनताराचे इन्स्टाग्रामवर पदार्पण, 'जवा पोस्टसह पोस्ट केला जुळ्या मलांसोबतचा धमाल व्हिडिओ
  3. Sushant Singh Rajput Sister Shweta Singh Kirti : रक्षाबंधनावर सुशांत सिंग राजपूतच्या बहिणीची भावनिक पोस्ट...

ABOUT THE AUTHOR

...view details