मुंबई - तमन्ना भाटिया ही साऊथ इंडियन फिल्ममधील लोकप्रिय स्टार अभिनेत्री आहे. सध्या तिने हिंदी सिनेसृष्टीतही आपला पाया भक्कम केला आहे. तिने आपल्या अभिनय क्षमतेने व सौंदर्याने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या तिने घातलेल्या एका दगिन्याची चर्चा होताना दिसत आहे.
तिच्या बोटात असलेली हिऱ्यांची अंगठी दोन कोटीची असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्यानंतर तमन्नाने हा दावा खोडून काढला आहे. तिने स्वतःसाठी खूप किंमती हिऱ्याची वस्तु घेतल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली होती. पण यात बातमी काहीच दम नस्लयाचे तमन्नाने म्हटले आहे.
इन्स्टाग्रामवर तमन्ना भाटियाने आपल्या बोटात घातलेल्या अंगठीसह फोटो शेअर केला. यात तिने सांगितले की बोटात असलेली अंगठी हिऱ्यांची नाही. फोटोसह तिने लिहिले की, एका बॉटल ओपनरच्या फोटो शूटसाठी ही एक नकली अंगठी घातली होती. ही अंगठी हिऱ्यांची नाही. मुलींना अशी प्रकारचे फोटो काढायला आवडते, असेही तिने पुढे लिहिले.
गेल्या दोन तीन दिवसात तमन्नाच्या या अंगठीबद्दल भरपूर बातम्या झळकल्या आहेत. राम चरणची पत्नी उपसाना हिने सेए रा नरसिंम्हा रेड्डी चित्रपटातील तमन्नाच्या योगदानाबद्दल ही अंगठी तिला गिफ्ट म्हणून दिली होती, अशाही बातम्या होत्या. उपासनाने एक पोस्ट लिहून या गिफ्टबद्दल सांगितल्यामुळे या अफवांना ऊत आला होता. तिन ही पोस्ट गंमत म्हणून केली होती. ाणि लोकांना ती अंगठी हिऱ्याची वाटली, इतकेच नाही तर त्याची किंमत दोन कोटी असल्याच्या अफवाही पसरल्या.