मुंबई :बाहुबली अभिनेत्री तमन्ना भाटिया आजकाल तिच्या नात्याशिवाय तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'जी करदा' या वेब सीरिजमुळेही चर्चेत आहे. खरं तर, या वेब सीरिजसाठी तमन्नाने तिचा 18 वर्षांचा जुना नियम मोडला आहे आणि या वेब सीरिजमध्ये तिचा सहकलाकार सुहेल नय्यरसोबत तिने खूप इंटिमेट सीन्स दिले आहेत. तमन्ना भाटियाने पहिल्यांदाच इंटीमेट सीन्स दिले आहे, याआधी ती नो किसिंग पॉलिसी फॉलो करत होती. त्यामुळे आता तिला लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. याप्रकरणी चाहत्यांनी तमन्नाला फार सुनाविले आहे. चाहते तिचा इतका बोल्ड अवतारात स्वीकारू शकले नाही आहे.
तमन्नाची मुलाखत :अलीकडेच तमन्ना एका मुलाखतीत सुहेल नय्यरसोबतची स्टीम केमिस्ट्रीबद्दल सांगितले. याशिवाय तिने दिग्दर्शक अरुणिमा शर्माने तिला कसे पडद्यावर इंटीमेट सीन करण्याचे सर्व सांगून तिच्यासाठी सर्व गोष्टी सोप्या करून दिल्या याबद्दल तिने सांगितले. या दृश्यांबद्दल बोलताना तमन्ना म्हटले, लावण्य आणि ऋषभ या पात्रांबद्दलीची कहाणी सांगणे महत्त्वपूर्ण होते. पुढे तिने म्हटले, ही दृश्ये लक्ष वेधण्यासाठी किंवा आकर्षित करण्यासाठी नाहीत. या प्रकारची अंतरंग दृश्ये रिलेशनशिप ड्रामाचा एक महत्त्वाचा घटक असल्याचे तिने म्हटले. पुढे सांगितले. 'लोकांना ते आवडो किंवा नाही, हे असेच आहे,' सुहेलने तिला इंटिमेट सीन्स देताना फार कंफर्टेबल केले होते. तिला किंवा सुहेल आपापल्या पात्रांचा अवलंब करणे कठीण वाटले नाही असे तिने सांगितले. तमन्नाने शोच्या दिग्दर्शकाला 'इंटिमसी इंस्ट्रक्टर' म्हणून संबोधत म्हटले, तिला आणि सुहेलला त्यांच्या पात्रांमधील जवळचे नाते आणि ते एकमेकांना कसे ओळखत असतात हे यावेळी तिला समजले. पुढे ती म्हणाली, 'एका नॉन-इंटिमेट सीनमध्येही आमची शारीरिकता जणू आम्ही एका युनिटसारखीच केली होती.'