मुंबई : अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या तिच्या 'जी कारदा' या वेब सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशन दरम्यान, तमन्नाने लग्नाबद्दल आपले मत व्यक्त केले. तमन्ना अशी मानते की लग्नात खूप जबाबदारी येते. याशिवाय ती अशी म्हणते की, फक्त इतर लोक लग्न करतात म्हणून आपण लग्न करू नये असे तिने ठामपणे यावेळी सांगितले. या चित्रपटात महिलांच्या शेल्फ लाइफच्या बाबतीत गोष्टी चांगल्या प्रकारे मांडण्यात आल्या आहे. त्यामुळे याबाबत सर्वाचे मत बदलताना दिसेल, असेही तिने सांगितले.
तमन्नाची मुलाखत :तमन्नाने म्हटले, 'मला वाटतं की तुम्हाला लग्न करायचे असेल तेव्हा तुम्ही लग्न करावे. लग्न ही एक मोठी जबाबदारी आहे. ती पार्टी नाही. त्यासाठी खूप काही करावे लागते, आपण जशी रोपट्याची कुत्राची किंवा मुलांची काळजी घेतो त्याप्रमाणेच ही जबाबदारी सुद्धा पार पाडावी लागते. त्यामुळे जेव्हा तुम्ही अशा जबाबदारीसाठी तयार आहात तेव्हा तुम्ही लग्न करा. असे तिने यावेळी सांगितले. 33 वर्षीय तमन्नाने कबूल केले की तिला 30 व्या वर्षी लग्न करायचे होते त्यानंतर तिला लगेच मुल देखील हवे होते याची तिला कल्पना होती. मात्र आता परिस्थिती बदलली आहे, कारण तिला चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका फार जास्त प्रमाणात मिळत आहे. तमन्ना पुढे सांगितले, 'जेव्हा मी काही वर्षांपूर्वी काम करायला सुरुवात केली होती, तेव्हा असे वाटत होते की एखाद्या अभिनेत्याची कारकीर्द फक्त 8-10 वर्षे असते. म्हणून मी काही वेळच या चित्रपटसृष्टीत काम करेल आणि त्यानंतर मी लग्न करेन आणि त्यानंतर मला दोन मुले होतील. मी 30 नंतर ही योजना आखली होती. म्हणून, जेव्हा मी 30 वर्षांचा झाले, तेव्हा मला कळले की माझा नुकताच जन्म झाला आहे, हे 'पूर्णजन्म' सारखे होते. आज आपण आवडीच्या गोष्टी करतो आणि त्यामुळे आपल्याला जो मार्ग ठिक वाटतो तो आपण निश्चित करतो आज माझ्याकडे तो पर्याय आहे.'