हैद्राबाद : बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटांची अभिनेत्री तमन्ना भाटिया गेल्या काही दिवसांपासून फार चर्चेत आहे. नंदामुरी बालकृष्णाच्या एन.बी.के108 चित्रपटाच्या एका आयटम सॉंगवरून चित्रपट निर्माते अनिल रविपुडी यांच्यासोबत भांडण झाल्याच्या अफवांचे तिने खंडन केले होते. मिळालेल्या माहितीनुसार महेश बाबू स्टारर सरिलेरू नीकेव्वरु मधील डांग डांग हे गाणे सादर करणार्या तमन्नाला रविपुडीने संपर्क साधला होता, परंतु या दोघांमध्ये मानधनावर मतभेद झाले होते. अशी एक बातमी पसरवली होती. आता यावर तमन्नाने आपला मौन तोडले आहे. तिने या बातमीचे खंडन करत म्हटले आहे की , हे खरे नाही.
तमन्नाने वादाबद्दल दिली स्पष्टता : तमन्ना तिच्या ट्विटर प्रोफाईलवर याबद्दलची स्पष्टता सांगत तिने लिहले की. '@अनिल रविपुडी सरांसोबत काम करताना मला नेहमीच आनंद झाला आहे. मला त्यांच्याबद्दल आणि नंदामुरी बालकृष्ण सर या दोघांबद्दल खूप आदर आहे. त्यामुळे माझ्या आणि त्यांच्या नवीन चित्रपटातील गाण्याबद्दलच्या या निराधार बातम्या वाचून मला खूप अस्वस्थ वाटते. कृपया तुम्ही संशोधन करा. बिनबुडाचे आरोप करण्यापूर्वी' असे तिने ट्विटद्वारे स्पष्टता दिली आहे.