महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Lust Stories 2 Teaser : 'लस्ट स्टोरीज २'मध्ये तमन्नासह विजय वर्माची दिसणार केमिस्ट्री, नेटफ्लिक्सवर टीझर प्रदर्शित - नीना गुप्ता

लस्ट स्टोरी 2 चा टीझर रिलीज झाला आहे. टीझरमध्ये, विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांच्यात जोरदार भांडणे होताना दाखविले आहे. याशिवाय विजय हा रूमर्ड गर्लफ्रेंड असलेल्या तमन्नाला कपाळावर चुंबन घेत आहे.

Tamannaah Bhatia and Vijay Varma
विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया

By

Published : Jun 7, 2023, 11:16 AM IST

मुंबई : तब्बल पाच वर्षांनंतर प्रसिद्ध चित्रपट निर्माते बॅनर (आरएसव्हीपी आणि फ्लाइंग युनिकॉर्न इएनटी) च्या 'लस्ट स्टोरीज'चा दुसरा भाग 'लस्ट स्टोरीज-2' येत आहे. या विनोदी ड्रामा वेब सीरिजची प्रेक्षक फार आतुरतेने वाट पाहत आहे. या वेब सीरिजला प्रेक्षकांचा फार प्रतिसाद मिळाला आणि या सीरिजला प्रेक्षकांनी फार भरभरून प्रेम दिले. आता 6 जून रोजी 'लस्ट स्टोरीज-2'चा टीझर हा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. लस्ट स्टोरी-2 चा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर या सीरिजचा टीझर हा आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या वेब सीरिजमध्ये बी-टाऊनचे सर्वात गाजलेले जोडपे अभिनेता विजय वर्मा आणि अभिनेत्री तमन्ना भाटिया हे दोघे असणार आहे. शिवाय या वेब सीरिज टिझरमध्ये विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांच्यात जोरदार भांडणे होताना दाखविले गेले आहे. याशिवाय विजय हा रूमर्ड गर्लफ्रेंड असलेल्या तमन्नाला कपाळावर किस करताना देखील दिसत आहे.

लस्ट स्टोरीज-2 : सध्याला या जोडप्याचा एक रोमँटिक सीन हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे तमन्ना आणि विजय यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर फार चर्चा होताना दिसत आहे. तमन्ना आणि विजय शिवाय या वेब सीरिजमध्ये अंगद बेदी, काजोल, कुमुद मिश्रा, मृणाल ठाकूर आणि नीना गुप्ता महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्याचबरोबर ही वेब सीरिज चार दिग्दर्शकांनी मिळून बनवली आहे. अमित रवींद्रनाथ शर्मा, आर बाल्की, कोंकणा सेन शर्मा आणि सुजॉय घोष अशी त्यांची नावे आहेत. या वेब सीरिजचा पहिला भाग, 2018 रोजी आला होता. आधी या वेब सीरिजची निर्मिती करण जोहर, झोया अख्तर, अनुराग कश्यप आणि दिबाकर बॅनर्जी यांनी संयुक्तपणे केली होती.

वर्कफ्रंट : तमन्ना ही आता 'बांद्रा' चित्रपटातून मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार तमन्ना ही, '2023मध्ये खूप व्यस्त असणार आहे. चाहते तिच्या मल्याळम चित्रपटाची वाट फार आतुरतेने पाहत आहे. त्यामुळे तमन्नाला मल्याळम चित्रपटात पाहणे हे फार वेगळे असणार आहे

हेही वाचा :

  1. Sidharth Malhotra Reeact : कियारा अडवाणीच्या 'सत्यप्रेम की कथा'च्या ट्रेलरवर सिद्धार्थ मल्होत्राने दिली प्रतिक्रिया
  2. Shreyas Talpade reveals : बहुतेक चित्रपटासाठी दुसरी निवड असल्याचा श्रेयस तळपदेने केला खुलासा
  3. Neha Kakkar birthday : नेहा कक्कडने आई वडिलांसोबत साजरा केला ३५ वा वाढदिवस

ABOUT THE AUTHOR

...view details