महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Take it easy movie : स्पर्धात्मक युगात माणुसकीचे दर्शन देणारा 'टेक इट इझी' चित्रपट 11 नोव्हेंबरला चित्रपटगृहात!

भारतात हजारोंच्या संख्येने चित्रपट बनत असतात. परंतु लहान मुलांसाठी बनणाऱ्या चित्रपटांची संख्या कमी आहे. लवकरच एक बालचित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट तब्बल 10 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'टेक इट इझी' (Take it easy) असे नाव असणाऱ्या चित्रपटाची मराठी आवृत्ती 11 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. नाते संबंधात स्वप्न आणि स्पर्धा यांचा ताळमेळ कसा साधायचा हे हा चित्रपट सांगतो.

Take it easy movie
टेक इट इझी

By

Published : Nov 10, 2022, 9:52 AM IST

मुंबई: भारतात हजारोंच्या संख्येने चित्रपट बनत असतात. परंतु लहान मुलांसाठी बनणाऱ्या चित्रपटांची संख्या कमी आहे. लवकरच एक बालचित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा तचित्रपट तब्बल 10 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'टेक इट इझी' (Take it easy) असे नाव असणाऱ्या चित्रपटाची मराठी आवृत्ती 11 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. नाते संबंधात स्वप्न आणि स्पर्धा यांचा ताळमेळ कसा साधायचा हे हा चित्रपट सांगतो.

स्पर्धात्मक युगात माणुसकीचे दर्शन: या चित्रपटाद्वारे दिग्दर्शकाने पालक आपले अपूर्ण स्वप्न मुलांच्या द्वारे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात पण यात ते त्यांच्या मुलांची आवड आणि त्यांची स्वप्ने पायदळी दुडवतात याकडे प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे, तर दुसरीकडे लहान मुलांच्या निखळ मैत्रीचे दर्शन घडवून दिग्दर्शकाने या स्पर्धात्मक युगात माणुसकीचे दर्शन देऊन लहान मुलेही मोठ्यांना मोलाची शिकवण देऊ शकतात असा संदेश दिला गेला आहे.

वडील आणि मुलगा यांच्या नातेसंबंधावर आधारित: हा चित्रपट हिंदीत चित्रित करण्यात आला असून मराठी, तेलगू, मल्याळम, कन्नड, बंगाली, हिंदी, भोजपुरी, पंजाबी, इंग्रजी, यासारख्या विविध भाषांमध्ये डब करण्यात आला आहे. 'टेक इट इझी' (Take it easy) हा चित्रपट गोव्यामध्ये टॅक्स फ्री करण्यात आला असून महाराष्ट्रात प्रदर्शनाच्या दिवशी एका तिकिटवर एक तिकीट मोफत मिळणार असून प्रेक्षकांसाठी ही एक पर्वणीच आहेत. हा चित्रपट वडील आणि मुलगा यांच्या नातेसंबंधावर आधारित आहे.

चित्रपटात दिग्गज अभिनेते आहेत: या चित्रपटाचे निर्माते धर्मेश पंडित असून कथा आणि संकल्पना ही त्यांचीच आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन सुनील प्रेम व्यास यांनी केले असून एडिटिंग कुणाल प्रभू सुनील प्रेम व्यास, वितरक निर्माता - राजू कांबळे आहेत. या चित्रपटात विक्रम गोखले (Vikram Gokhale), विजय कश्यप (Vijay Kashyap), ललित तिवारी (Lalit Tiwari) सारखे दिग्गज अभिनेते आहेत तर सोनू निगम (Sonu Nigam), शंकर महादेव (Shankar Mahadev) आणि जावेद अली (Javed Ali) यांनी हिंदी साठी गाणे गायले असून मराठीसाठी दिनेह अर्जुना , डॉ. नेहा राजपाल यांनी गायले आहे.

सुवर्णसंधीचा लाभ प्रेक्षकांना मिळणार: चित्रपट गृहात 11 नोव्हेंबरला एकावर एक फ्री तिकिटांच्या सुवर्णसंधीचा लाभ प्रेक्षकांना मिळणार आहे. बालदिनांचे औचित्य साधून ओशो इंटरनॅशनल इंटरटेन्मेंट, एल एल पी निर्मित प्रोड्युसर धर्मेश पंडित यांचा 'टेक इट ईझी' हा बालचित्रपट 11 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details