मुंबई:Happy Birthday Tabu : बॉलिवूडची सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री तब्बू आज (4 नोव्हेंबर 2022) तिचा 52 वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलीवूडसोबतच या अभिनेत्रीने दक्षिणेतील तमिळ, तेलगू, मल्याळम आणि बांगला भाषेतही आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. यासोबतच तिने हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त, 'दृश्यम 2' सोबत तिचे कोणते चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहेत हे जाणून घेऊया.Tabu upcoming film
खुफीया: खुफीया हा सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज दिग्दर्शित आगामी नेटफ्लिक्स मिस्ट्री ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात तब्बूसोबत अली फजल, वामिका गाबी आणि आशिष विद्यार्थी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 9 नोव्हेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.