मुंबई - TMKOC:टीव्हीचा सर्वात लोकप्रिय शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' सध्या चर्चेत आहे. हा शो अनेक दिवसांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. सध्या या शोबाबत काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. दयाबेनला परत न आणल्यामुळं अनेक प्रेक्षकांनी शोवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आता 'तारक मेहता का उल्टा चष्मा' बंद होऊ शकतो, असं बोललं जात आहे. असित मोदी हा शो बंद करणार आहेत का ? असे अनेक प्रश्न सध्या निर्माण होत आहेत. असित मोदीनं एका मुलाखतीत यावर प्रतिक्रिया देत सांगितलं की, ''दयाबेनच्या पात्राचा शोध सध्या सुरू आहे. कोणीतरी सापडल्यानंतर ते या पात्राला शोमध्ये परत आणतील.''
दयाबेनच्या पुनरागमनावर असित मोदीनं दिली ही प्रतिक्रिया : असित मोदीनं पुढं म्हटलं की, ''मी येथे माझ्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आलो आहे आणि त्यांच्याशी खोटे बोलण्यासाठी नाही. काही अडचणींमुळं आम्ही दयाबेनचं पात्र परत आणू शकलो नाही. याचा अर्थ असा नाही की आम्ही दयाबेनचे पात्र पुन्हा शोमध्ये आणणार नाही. आता फक्त दिशा वकानी दयाबेनची भूमिका साकारणार असून, तिची जागा दुसरी कोणी घेणार का हे येणारा काळ सांगेल. पण मी वचन देतो की दयाबेनची व्यक्तिरेखा शोमध्ये नक्कीच परत आणेल''. दिशा वकानीचं पात्र दयाबेन हे चाहत्यांना खूप आवडते, त्यामुळं अनेकजण या पात्राच्या पुनरागमनाची वाट आतुरतेनं पाहत आहेत.