मुंबई - अभिनेत्री तापसी पन्नूने ( Taapsee Pannu ) बुधवारी तिच्या आगामी थ्रिलर "दोबारा" ( Dobaaraa ) मधील अत्यंत अपेक्षित ट्रेलर आणि तिचा पहिला लूक अनावरण करून तिच्या चाहत्यांना खूश केले आहे. तापसीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर ट्रेलर शेअर केला, "वक्त को थोडा वक्त दो, वो सब बदल देगा. सब कुछ. हे वादळ 'अंतरा'साठी आयुष्य बदलणारा अनुभव घेऊन येते."
निहित भावे लिखित व अनुराग कश्यप दिग्दर्शित आणि एकता कपूर निर्मित या चित्रपटात राहुल भट्ट, सास्वता चटर्जी, विदुशी मेहरा, सुकांत गोयल, नास्सर, निधी सिंग आणि मधुरिमा रॉय यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
ट्रेलरमध्ये तापसी, तिचा नवरा आणि त्यांची मुलगी एका नवीन घरात राहायला जाताना दाखवले आहेत. थोड्याच वेळात, कुटुंबाला कळते की 26 वर्षांपूर्वी वादळाच्या वेळी शेजारच्या घरात एका लहान मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तापसीचे पात्र त्याच तरुण मुलाशी संवाद साधताना दिसते. वादळाच्या वेळी तापसीची व्यक्तीरेखा असलेले पात्र भूतकाळ कसा बदलते व त्यामुळे वर्तमानही कसा बदलतो हे उत्कंठा वाढवणारे व टाईम ट्रॅव्हलचा अनुभव देणारे आहे.