मुंबई - Taapsee Pannu Angry On Paps:बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू शनिवारी एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना स्पॉट झाली. यादरम्यान तापसीला पापाराझींनी घेरलं, त्यानंतर तिनं चिडून पॅप्सला तिच्या कारपासून दूर जाण्यास सांगितलं. सध्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पापाझीनं शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये तापसी ही चिडून पापाराझीला बोलताना दिसत आहे. या व्हिडिओवर अनेकजण कमेंट करत आहेत. काहीजण तिला ट्रोल देखील करत आहे. तापसी पन्नू अनेकदा पापाराझींसोबत वाद घालताना दिसली आहे. यापूर्वी जानेवारी 2023 मध्ये तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तिनं आपला राग पॅप्सवर काढला होता.
तापसीचा झाला वाद :या क्लिपमध्ये तापसी पापाराझीशी बोलल्यानंतर तिच्या कारमध्ये बसते, त्यानंतर एकजण तिला 'धन्यवाद. अलविदा तापसी जी. तुम्ही खूप छान आहात', असं म्हणतो. त्यानंतर ती कारचा दरवाजा बंद करत आणि पप्प्सला 'धन्यवाद' म्हणते. तापसीच्या आउटफिट बोलायचं झालं तर तिनं ब्लॅक टॉप आणि फिकट पिवळ्या रंगाचा स्कर्ट परिधान केला होता. यावर तिनं सुंदर मेकअप केला आहे. यासोबत तिनं बॅगही घेतली आहे. या लूकमध्ये ती खूप खास दिसत होती. तापसीनं 'ब्लर', धप्पड, 'हसीन दिलरुबा', 'थप्पड', 'जुडवा 2', 'पिंक' यासह अनेक हिंदी आणि साउथ चित्रपटांमध्ये काम केलं आहे.