मुंबई (महाराष्ट्र) - अभिनेत्री-निर्माती तापसी पन्नू ( Taapsee Pannu ) तिच्या 'धक धक' ( Dhak Dhak ) नावाच्या दुसऱ्या चित्रपटाच्या निर्मितीसाठी तयार आहे. हा चित्रपट चार महिलांची आणि त्यांच्या आयुष्य बदलून टाकणाऱ्या जगातील सर्वात उंच मोटरेबल पासपर्यंतचा प्रवासाची कथा आहे. 'धक धक' चित्रपटाची निर्मिती तापसी पन्नूच्या प्रोडक्शन हाऊस आऊटसाइडर्स फिल्म्स अंतर्गत व्हायकॉम 18 स्टुडिओच्या सहकार्याने केली जाईल.
या चित्रपटात फातिमा सना शेख, रत्ना पाठक शाह, दिया मिर्झा आणि संजना सांघी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'धक धक' या आगामी चित्रपटाची तापसी करणार असून प्रांजल खंडडिया आणि आयुष माहेश्वरी हे सहनिर्माते आहेत. हा चित्रपट पारिजात जोशी आणि तरुण दुडेजा यांनी सहलेखन केला आहे आणि तरुण दुडेजा दिग्दर्शित आहे.
तापसी म्हणते: "आम्ही प्रेक्षकांना एक दृश्य अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे जो त्यांनी क्वचितच पडद्यावर पाहिला असेल. धक धक ही अशी चार महिलांची गोष्ट आहे ज्यांना वाटते की स्वातंत्र्य हे दिले गेलेले नसावे तर ते त्यांच्या मालकीची असले पाहिजे. चष्मे बद्दूर, शाबाश मिठू आणि आता धक धक असा चित्रपटसृष्टीतील प्रवासात Viacom18 स्टुडिओ हा माझ्यासाठी महत्त्वाचा भाग आहे. मला खात्री आहे की ही राईड समृद्ध करणारी असेल."