मुंबई :बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन पुन्हा एकदा तिच्या 'ताली' चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटात ती गौरी सावंत या ट्रान्सजेंडरची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट गौरीच्या खऱ्या आयुष्यावर आधारित आहे. 'ताली' चित्रपट १५ ऑगस्ट रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर रिलीज होणार आहे. सुष्मिताचे चाहते या चित्रपटच्या रिलीजची वाट खूप आतुरतेने पाहत आहेत. दरम्यान आता नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. याशिवाय हा ट्रेलर सुष्मिताने तिच्या इंस्टाग्राम पेजवर रिलीज केला आहे, यासह तिने हा चित्रपट रुपेरी पडद्यावर कधी दाखल होणार हे देखील सांगितले आहे.
'ताली' चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीज :सुष्मिता सेनने शेअर केलेल्या ट्रेलरमध्ये असे दाखविण्यात आले आहे. गौरी सावंत यांचे आधीचे नाव गणेश होते. गणेश हा क्लासरूममध्ये त्याच्या टिचरच्या प्रश्नाचे उत्तर देत म्हणतो की, मला आई बनायचे आहे, त्यानंतर त्याला क्लासरूममधील सर्व मुले हसतात, नंतर गणेश हा ट्रान्सजेंडर महिलांसोबत डान्स करताना दिसतो. त्यानंतर गणेश हा महिलांसारखी टिकली लावतो आणि साडी घालतो. या रुपात त्याला त्याची आई पाहते. त्यानंतर तो कॉलेजच्या लाईनमध्ये दिसतो, तिथे मुला आणि मुलींच्या लाईनसाठी बोलवले जाते त्यानंतर गणेश हा कन्फ्यूज होतो. नंतर तो तृतियपंथीसाठी सकारात्मक कार्य करताना दिसतो, यानंतर त्याला एक ट्रान्सजेंडर म्हणतो की, आमच्यासारखा बन मग बाकी सर्व काम कर या शब्दावर गणेश विचार करून स्वत:ते ऑपरेशन करून पूर्णपणे ट्रान्सजेंडर बनतो. ट्रेलरच्या शेवटी तो तृतियपंथीच्या हक्कासाठी लढाई लढताना दिसतो. असे या ट्रेलरमध्ये दाखविले आहे.